वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अफगाणिस्तानमधील तालिबान राजवटीला मान्यता देण्याची अमेरिकेसह जगातील अनेक देशांना कोणतीही घाई नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. USA will talking another nations for ban on taliban
जगाच्या अपेक्षा पूर्ण करण्यात तालिबानला कितपत यश येते, त्यावर बरेच काही अवलंबून आहे, असे ‘व्हाइट हाऊस’च्या माध्यम प्रवक्त्या जेन साकी यांनी सांगितले. ‘आम्ही अनेक देशांच्या प्रतिनिधींशी अफगाणिस्तानमधील परिस्थिती आणि तालिबानी राजवटीबाबत बोललो आहोत. त्यांच्या सत्तेला मान्यता देण्याची कोणालाही घाई नाही. त्यांनी जगाच्या अपेक्षा आधी पूर्ण कराव्यात. सत्ता बळकावताना दिलेल्या आश्वायसनांचीही पूर्तता करावी,’ असे साकी यांनी सांगितले.
दरम्यान गेली वीस वर्षे अमेरिकेच्या ताब्यात असलेला काबूल विमानतळ कतारच्या ताब्यात दिला जाण्याची चर्चा आहे. या विमानतळाचे कामकाज चालविण्याची जबाबदारी तालिबानने कतारकडे सोपविली जाण्याची शक्यता असून त्यांचे तांत्रिक पथक आज काबूलला दाखलही झाले आहे. या विमानतळाचे कामकाज तुर्कस्तानने चालवावे अशी तालिबानची इच्छा होती, मात्र तुर्कस्तानकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कतारचे तांत्रिक पथक केवळ विमानतळाच्या कामकाजासाठी तांत्रिक सहकार्य करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App