राजकीय नेत्यांनी शब्द जपून वापरले पाहिजेत, मतभेद असावेत मनभेद नकोत ; सुधीर मुनगंटीवार यांचा सल्ला


वृत्तसंस्था

मुंबई : सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शब्द जपून वापरले पाहिजेत. मतभेद जरूर असावेत पण, मनभेद नकोत, असा सल्ला भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.Political leaders should use words carefully, There may be differences in various points, not should be in Mind’s: Sudhir Mungantiwar’s advice

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विधानानंतर राज्यात काल भाजप-शिवसेनेत रणकंदन माजले. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले आहे.नेत्यांच्या वक्तव्यानंतर बिथरून जाणाऱ्या कार्यकर्त्यांबाबत ते म्हणाले, त्यांनी संयमाची भूमिका घ्यावी. नेत्यांवरील केस मागे घेतले जातील. पण, कार्यकर्त्यांवरच्या केस तशाच राहतात, हे लक्षात घ्यावे.



गेल्या दीड वर्षात राजकीय नेतेमंडळी एकमेकांवर टीका करताना अपशब्द वापरत आहेत. आता त्यावर उपाय काढण्यासाठी राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची एकत्र आलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोरोनाचे जंतू सोडू , असे बोलले जाते, अनेक जण जाहीर धमक्या देतात.

प्रश्न एका शब्दाचा नाही, नारायण राणे जे बोलले ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. राज्यपालांबाबत वक्तव्य, मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द, विरोधी पक्ष नेत्यांबाबतचं वक्तव्य, मला वाटतं जनतेला याची लाज वाटते, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हंटले आहे.

कोणत्याही नेत्यांकडून अशा शब्दांचा वापर करणं चुकीचं, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील हे संयमाने बोलतात. आपल्याला सर्वांनाच एकत्रित येऊन विचार करण्याची गरज आहे. राणे साहेब बोलले म्हणून फक्त राडा करायचा पण राज्यपालांबाबत बोलताना ती शैली आहे किंवा फडणवीसांबाबत बोलताना कोरोनाचे जंतू तोंडात सोडू, असे म्हणायचं, असे कसे चालेल ? याबाबत तेव्हा मात्र फेव्हिकॉल टाकल्यासारखे ओठ चिकटवून ठेवायचे हे योग्य नाही, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हंटले आहे.

सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शब्द जपून वापरले पाहिजे, आणि यासंदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. मतभेद विचारांचे असावे, मनभेद होता कामा नयेत. महाराष्ट्रातील पुरोगामी परंपरा टिकली पाहिजे, फक्त आता पुरताच विचार करता कामा नये.

टीका करताना व्यक्तिगत स्तरावर ती येऊ नये, असंही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.चंद्रकांत पाटील यांना टोपण नावाने ओळखले जाते. ते देखील चुकीचं आहे, मग आरेला कारे आणि आरेला मारे होणारच, असंही मुनगंटीवार यांनी सांगितले.

.Political leaders should use words carefully, There may be differences in various points, not should be in Mind’s: Sudhir Mungantiwar’s advice

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात