वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Railway Minister Vaishnav ठाण्यातील मुंब्रा येथे सोमवारी घडलेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेने पुन्हा एकदा मुंबईतील लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. या अपघातात 13 प्रवासी खाली पडले असून त्यातील 4 जणांचा मृत्यू झाला. कसारा आणि कल्याण लोक पास होताना दारात लटकणारे प्रवासी रुळांवर पडल्याने आता सरकारला जाग आली आहे. या घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. मुंबई उपनगरीय लोकलच्या डब्यांचे संपूर्ण डिझाईनच बदलण्याचा निर्णय रेल्वे मंत्र्यांनी घेतला आहे.Railway Minister Vaishnav
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतलेल्या बैठकीत मुंबईतील लोकल ट्रेनमधील प्रवासी सुरक्षेबाबत आणि गर्दीसंदर्भात सखोल चर्चा झाली. या बैठकीत इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) चे अभियंते आणि तज्ज्ञही सहभागी झाले. बैठकीत नॉन-एसी लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवावेत की नाही, यावर केंद्रित चर्चा झाली. मात्र, बंद दरवाज्यांमुळे ट्रेनमध्ये व्हेंटिलेशनचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, अशा चिंता अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. या चर्चेतून लोकल ट्रेनला दरवाजे असावेत की नसावे यासंदर्भात तीन पर्याय समोर आले आहेत. परिणामी, सध्या धावणाऱ्या लोकलमध्ये दरवाजे बसवण्याऐवजी नव्या डिझाइनच्या कोचेस तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानंतर, नॉन एसी लोकल ट्रेनसाठी नव्याने बनविण्यात येणाऱ्या ट्रेनच्या मॉडेलमध्ये अशी व्यवस्था करण्यात यावी, ज्याने व्हेंटीलेशनची समस्या येणार नाही, असा निर्णय बैठकीत झाला. मुंबई लोकलसाठी तज्ज्ञांच्या मदतीने तीन वेगवेगळ्या स्वरूपातील कोच डिझाइन्स तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रवाशांना स्वयंचलित दरवाज्यांची सुरक्षितता मिळेल, त्याचबरोबर पुरेसे हवेशीर वातावरणही राखले जाईल, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.
मुंबई लोकलसाठी तीन नवीन डिझाईन
लोकल ट्रेनच्या दरवाज्यामध्ये लूव्हर्स म्हणजे हवा खेळती राहणाऱ्या पट्ट्या बसवण्यात येणार, त्यामुळे व्हेंटीलेशन हवा खेळती राहू शकेल.
रेल्वे डब्ब्याच्या छतावर व्हेंटीलेशन युनिट्स बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे, बाहेरुन ताजी हवा लोकलच्या डब्ब्यात येऊ शकेल.
लोकल ट्रेनच्या कोचमध्ये वेस्टीब्यूल्स बसविण्यात येतील, ज्याने एका कोचमधून प्रवासी दुसऱ्या कोचमध्ये सहजपणे जाऊ शकेल. त्यातून ट्रेनमधील गर्दी स्वाभाविकपणे मोकळी होईल.
जानेवारी 2026 पासून येणार नवीन कोच
रेल्वेमंत्र्यांसोबत आज पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेच्या सुरक्षेसाठी नव्या लोकल ट्रेन मॉडेलची घोषणा करण्यात आली आहे. या नव्या डिझाइनवरील काम वेगात सुरू असून येणाऱ्या नोव्हेंबर 2025 पर्यंत ही सुधारित लोकल ट्रेन तयार होणार आहे. त्यानंतर नियमानुसार आवश्यक तांत्रिक चाचण्या, निरीक्षण आणि प्रमाणनाच्या प्रक्रियेतून ही ट्रेन जाईल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जानेवारी 2026 पासून ही नवी लोकल ट्रेन मुंबईतील प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या नव्या ट्रेनचे मॉडेल खास मुंबईच्या उपनगरीय वाहतुकीसाठी डिझाइन करण्यात येत असून, सध्या धावणाऱ्या 238 एसी लोकल गाड्यांव्यतिरिक्त हे नवे मॉडेल असेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App