गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याला ईमेल आला Threat to blow up the Ministry of Home Affairs building with bombs
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील सरकारी इमारतींना एकापाठोपाठ एक बॉम्ब स्फोटाच्या धमक्या येत आहेत. दिल्लीतील शाळांनंतर आता नवी दिल्लीतली गृह मंत्रालयाच्या इमारतीला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याला ईमेलवर ही धमकी मिळाली आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा ईमेल आज म्हणजेच बुधवारी दुपारी ३ वाजता अधिकाऱ्याला आला. या धमकीची माहिती तत्काळ पोलीस नियंत्रण कक्ष आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना देण्यात आली, त्यानंतर गृह मंत्रालयाच्या इमारतीची तपासणी करण्यात आली. पोलिस तज्ज्ञ ईमेलची चौकशी करत आहेत.
दिल्ली अग्निशमन सेवेनुसार, नवी दिल्ली परिसरातील नॉर्थ ब्लॉकमध्ये असलेल्या पोलीस नियंत्रण कक्षाला बॉम्बची धमकी असलेला मेल मिळाला होता. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या असून, अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
दिल्ली अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, संपूर्ण इमारतीची कसून तपासणी करण्यात आली आहे. नॉर्थ ब्लॉकमध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने गृह मंत्रालयाच्या इमारतीत बॉम्ब टाकण्याची धमकी देणारा ईमेल मिळाल्यानंतर डीएफएसला कॉल केला होता. झडतीदरम्यान काहीही संशयास्पद आढळले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App