उदयनिधी : पुत्र एम. के. स्टालिन यांचे, पण राजकीय वारस मणिशंकर – राहुलचे!!


सनातन धर्माला मलेरिया, डेंगी, कोरोना अशा अश्लाघ्य उपमा देऊन त्याच्या निर्मूलनाची दर्पोक्ती करणारे उदयनिधी हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचे पुत्र जरूर आहेत, पण ते राजकीय वारस मात्र मणिशंकर अय्यर आणि राहुल गांधी यांचे ठरत आहेत!!Though udayanidhi is son of m.k. stalin, he political heir of manishankar ayer and rahul gandhi

कारण सनातन धर्माला शिव्या देऊन उदयनिधी यांनी “इंडिया” आघाडीच्या राजकीय अपयशाचा खड्डा आणखी खोल खणला आहे. उदयनिधी यांनी सनातन धर्माला शिव्या देऊन कुठला मोठा समाज अथवा धर्म सुधारणेचा तीर मारलेला नाही, तर त्या ऐवजी त्यांनी सनातन धर्मियांच्या एकजुटीलाच वेगळे नकारात्मक प्रोत्साहन दिले आहे आणि त्यातूनच त्यांनी चक्क मध्य प्रदेश, राजस्थान या विधानसभा निवडणूक प्रचाराचा भाजपच्या हातात आयता मुद्दा दिला आहे.

जयललितांचे राजकीय संतुलन

इतकेच नाही, तर खुद्द तामिळनाडू देखील त्यांनी अण्णा द्रमुकला तसाच प्रचाराचा आयता मुद्दा हातात सोपविला आहे. तामिळनाडूत भले द्रविड मुन्नेत्र कळघम हा पेरियार, अण्णा दुराई यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा चालवत असेल, पण त्यांना राजकीय सत्ता प्राप्त झाल्यानंतर पेरियार किंवा अण्णांची मूळ आक्रस्ताळी भाषा वापरून चालणार नाही. तशी वापरून तामिळनाडू 1970 नंतरच्या निवडणुकांमध्ये कोणाला फारसे यश आलेले नाही. उलट एम. जी. रामचंद्रन आणि जयललिता यांच्या अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम यांच्या या पक्षाने त्यांचा समाज सुधारणेचा वारसा पुढे चालवला असला तरी भाषेत बदल करून तामिळनाडूमध्ये अधिक लोकप्रियता मिळवली, हा इतिहास आहे.जयललिता या तर सनातनधर्मीय प्रथा परंपरा उघडपणे पाळायच्या. अनेक मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेणे, नवस बोलणे, त्या मंदिरांना हत्ती अर्पण करणे असे प्रकार जयललितांनी केले आणि त्यांनी तामिळनाडूत लोकप्रिय होऊन किमान चार वेळा सत्ता मिळवली, हा इतिहास फार जुना नाही. त्यामुळे एकाच वेळी पेरियर कृत समाज सुधारणा आणि दुसरीकडे सनातन धर्म पालन याचे संतुलन जयललितांनी टिकवून दाखविले होते, तसे संतुलन एम. के. स्टालिन यांना दाखविता आले नाहीच, पण त्या पलीकडे जाऊन त्यांच्या पुत्राने स्वतःचे मानसिक संतुलन ढासळवून द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे राजकीय संतुलनही ढासळून टाकल्याचे दिसत आहे आणि हाच तो मणिशंकर अय्यर आणि राहुल गांधी यांचा राजकीय वारसा आहे!!

 सावरकर – मोदींना मणिशंकरांच्या शिव्या

मणिशंकर अय्यर यांनी नाही का, सावरकर – मोदी यांचा अपमान करून भाजपला आयते मुद्दे दिले होते!!… सावरकर राजकीय दृष्ट्या संपूर्ण समाजाच्या विस्मृतीत गेले होते. पण मणिशंकर अय्यर यांना त्यांच्या काव्यपंक्ती अंदमानातल्या स्मृतिस्थळावरून काढून टाकण्याची कुबुद्धी सुचली आणि सावरकर पुन्हा राष्ट्रीय चर्चेचा मुद्दा बनले. बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांना जोडे हाणले. सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्याला राजकीय हवा दिली आणि त्यातून मर्यादित का होईना पण राजकीय यश मिळविले.

पण त्यातून काँग्रेस नेत्यांनी कोणता धडा घेतला नाही. उलट सावरकर हा मुद्दा नंतर राहुल गांधींनी कॅरी फॉरवर्ड केला आणि सावरकरांना राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आणून ठेवले. मणिशंकर अय्यर यांनी मोदींना “नीच” म्हटले. त्याचा फटका काँग्रेसला वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये बसला. राहुल गांधी देखील मोदींनाच टार्गेट करतात. त्याचा “रिव्हर्स इम्पॅक्ट” होतो, हे अनेक निवडणूक रणनीतीकारांनी राहुल गांधींना कानी कपाळी ओरडून सांगितले. पण राहुल गांधी ऐकत नाहीत आणि मुलींना टार्गेट करायचे थांबवत नाहीत. त्याचा परिणाम भोगावा लागतो, तो काँग्रेसला!!

नेमके तसेच उदयनिधी स्टालिन यांच्या सनातन धर्माविषयीच्या अश्लाघ्य वक्तव्यातून घडत आहे. उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माला शिव्या देऊन भाजपला आयता मुद्दा दिला आहे. उत्तर भारतातल्या सर्व राज्यांमध्ये हिंदुत्व – सनातन धर्म हे राजकीय चलनी नाणे आहे. त्याची राजकीय किंमत उदयनिधीच्या बेताल वक्तव्याने जास्त वाढली आहे. याचा भाजपला राजस्थान आणि मध्य प्रदेश निवडणुकीत निश्चित फायदा मिळण्याची शक्यता आहे.

राजकारणात कुठे, केव्हा आणि काय बोलावे हे जितके महत्त्वाचे आहे, त्यापेक्षाही काय बोलू नये, हे जास्त महत्त्वाचे असते. नेमका हाच तरतम भाव मणिशंकर अय्यर यांनी गमावला आणि त्यांचाच राजकीय वारसा एम. के. स्टालिन पुत्र उदयनिधी यांनी चालविला आहे. याचा परिणाम काय होईल??, हे सांगायला फार मोठ्या तज्ञाची गरज नाही

Though udayanidhi is son of m.k. stalin, he political heir of manishankar ayer and rahul gandhi

 

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात