काँग्रेसच अध्यक्ष खर्गेंचे चिरंजीव प्रियांक खर्गेंचा उदयनिधी स्टॅलिनला पाठिंबा; म्हणाले ”ज्या धर्मात समानता नाही तो…”


प्रियांक खर्गे  हे कर्नाटक सरकारचे मंत्री देखील आहेत.

विशेष प्रतिनिधी

बंगळुरू : तामिळनाडू द्रमुक सरकारचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ सुरूच आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म नष्ट करण्याबाबत बोलले होते, त्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका होत आहे. आता कर्नाटक सरकारचे मंत्री आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक खर्गे यांनी उदयनिधी स्टॅलिन यांना पाठिंबा दिला आहे. Congress President Khargens Son  Priyank Kharge support for Udayanidhi Stalin

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रियांक खर्गे म्हणाले की, ‘कोणताही धर्म जो विषमतेला प्रोत्साहन देतो आणि माणूस म्हणून सन्मानाचे उल्लंघन करतो तो धर्म नाही.  माझ्या मते… कोणताही धर्म जो समान अधिकार देत नाही किंवा माणसांना माणसांसारखी वागणूक देत नाही, तो एक रोग आहे.

द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान आपल्या वक्तव्यात म्हटले होते की, ‘काही गोष्टी आहेत, त्यांचा विरोध करणे पुरेसे नाही, त्यांना नष्ट करायचे आहे. डास, डेंग्यू ताप, मलेरिया, कोरोना या अशा गोष्टी आहेत ज्यांना आपण नुसता विरोध करू शकत नाही तर आपल्याला त्यांचा नायनाट करायचा आहे. सनातनही असेच आहे. उदयनिधी स्टॅलिन यांच्या या विधानानंतर जोरदार टीका सुरू झाली. भाजपानेही स्टॅलिनची खरडपट्टी काढली आणि विरोधी आघाडीवर टीका केली.

Congress President Khargens Son  Priyank Kharge support for Udayanidhi Stalin

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!