विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमासोबतच विवाह करण्याची परवानगी मागणाऱ्या केरळच्या कोट्टीयार जिल्ह्यातील पीडितेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. संबंधित तरुणीवर अत्याचार करणारा दोषी हा धर्मगुरू होता, या घटनेनंतर त्याला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती. The young woman’s desire to marry the rapist, the court’s clear refusal to intervene
संबंधित धर्मगुरूने पीडितेसोबत लग्न करण्याचे कारण पुढे करत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. ज्यावेळेस ही घटना घडली तेव्हा पीडिता अल्पवयीन होती तिने एका मुलाला जन्म देखील दिला होता. आज न्या. विनीत सरन आणि न्या. दिनेश माहेश्व री यांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणी पार पडली.
पेगॅसस हेरगिरी प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले, SIT तपास आणि सॉफ्टवेअरच्या खरेदीवर स्थगिती आदेशाची मागणी
उच्च न्यायालयाने याआधी सारासार विचार करूनच निर्णय घेतला असून त्यामध्ये हस्तक्षेप करण्याची आमची इच्छा नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. आता पीडितेला दोषीसोबत विवाह करायचा असेल तर तिने सत्र न्यायालयात जावे, असे न्यायालयाने आजच्या सुनावणीवेळी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App