कास्टिंग काऊचविरोधात आवाज उठविणाऱ्या तरुणींचे राज ठाकरेंकडून अभिनंदन, गुन्हेगारांना तातडीने अटक करण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी


विशेष प्रतिनिधी

ठाणे: कास्टिंग काऊचविरोधात आवाज उठविणाºया तरुणींचे अभिनंदन करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुन्हेगारांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. या लोकांना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू देऊ नका, अशी मागणीही राज ठाकरे यांनी ठाणे पोलिस आयुक्तांकडे केली आहे.Raj Thackeray congratulates for raising voice against casting couch, demands immediate arrest of criminals

एका नवोदित अभिनेत्रीला कास्टिंग काऊचचा अनुभव आल्यानंतर तिने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तक्रार केली होती. या अभिनेत्रीकडे चित्रपटाच्या दिग्दर्शकाने चित्रपटात काम देण्याच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी केल्याचे या अभिनेत्रीचे म्हणणे होते. या अभिनेत्रीच्या तक्रारीची दखल घेत मनसे कार्यकर्त्यांनी सापळा रचला. त्या सापळ्यात आरोप करण्यात आलेला दिग्दर्शक आल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला होता.



कास्टिंग काऊचविरोधात ज्या तरुणींनी आवाज उठवला त्या तरुणींचेही राज ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. आज राज ठाकरे यांनी ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजित सिंह यांच्याशी कास्टिंग काऊचबाबत चर्चा केली. कास्टिंग काऊच प्रकरणातील जे आरोप आहेत त्यांना अशी कलमे लावा की त्यांना जामीनच मिळू नये, अशी मागणीही राज ठाकरे यांनी सिंग यांच्याकडे केली.

अनेक तरुणी कास्टिंग काऊचच्या जाळ्यात अडकल्या आहेत. मात्र त्या तरुणी धाडसाने पुढे आल्या आणि त्या विरोधात त्यांनी आवाज उठवला. अशा तरुणींचे आपण अभिनंदन करत असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ठाण्यातील घोडबंदर रोड येथे असलेल्या फार्महाऊसवर हा सापळा रचला होता. तेथे जाऊन कार्यकर्त्यांनी या दिग्दर्शकाला घेरले आणि त्यानंतर त्याला चोप दिला. या कार्यकर्त्यांनी या अभिनेत्रीची या दिग्दर्शकाच्या हातून सुटका केली होती.

Raj Thackeray congratulates for raising voice against casting couch, demands immediate arrest of criminals

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात