राजस्थानातला विजय वसुंधरा राजेंनी बहाल केला मोदी, शाह आणि नड्डांच्या कुशल नेतृत्वाला!!


विशेष प्रतिनिधी

जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोल मधील आकड्यानुसार भाजपचा विजय आणि काँग्रेसचा पराभव झाला. पण भाजपने पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जनतेसमोर न आणता निवडणूक लढवली होती. त्यामुळे भाजप जिंकल्यानंतर कोणाला मुख्यमंत्री करणार??, यासाठी पाच-सहा नावे चर्चेत राहिली. The victory in Rajasthan was attributed by Vasundhara Raj to the skillful leadership of Modi, Shah and Nadda

या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी राजस्थान मधला भाजपचा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांना बहाल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची “सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास” ही घोषणा राजस्थानात लोकप्रिय ठरली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची रणनीती आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे कुशल नेतृत्व यामुळे राज्यात भाजपचा विजय झाला. हा विजय राजस्थान मधल्या भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांचा आणि जनता जनार्दनाचाही आहे, अशा शब्दांत वसुंधरा राजे यांनी भाजपच्या विजयाचे वर्णन केले.

वसुंधरा राजे आणि पंतप्रधान मोदी – गृहमंत्री शाह यांच्यातले राजकीय संबंध तणावाचे राहिल्याच्या बातम्या गेली काही वर्षे माध्यमांमध्ये येत आहेत. वसुंधरा राजे मोदी आणि शाहांचे ऐकत नाहीत. राजस्थानातल्या भाजप संघटनेमध्ये स्वतःच्याच मर्जीने पदे भरतात आणि पक्ष चालवतात, असे आरोप त्यांच्यावर होत राहिले, इतकेच नाहीतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी वसुंधरा राजेंचे राजकीय साटेलोटे असल्याची देखील चर्चा नेहमीच राजस्थानात होत राहिली.

या पार्श्वभूमीवर राजस्थानतला भाजपचा विजय वसुंधरा राजे यांनी मोदी, शाह आणि नड्डा यांना बहाल केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजस्थानात मोदी आणि शाह हे वसुंधरा राजे यांच्या ऐवजी बाबा बालकनाथ किंवा अन्य नेत्याकडे मुख्यमंत्री पदाची सूत्रे सोपवू शकतात, अशी चर्चा आहे. अशा स्थितीत वसुंधरा राजे यांना पॉलिटिकली कट टू साईज करून केंद्रात आणले जाईल किंवा साईडलाईन केले जाईल अशीही चर्चा आहे. अशा स्थितीत राजस्थानातल्या विजयाचे श्रेय मोदी, शाह आणि नड्डा यांना उघडपणे देऊन वसुंधरा राजेंनी त्यांच्यापुढे राजकीय शरणागती पत्करल्याची भाषा देखील राजकीय वर्तुळात वापरण्यात येत आहे.

The victory in Rajasthan was attributed by Vasundhara Raj to the skillful leadership of Modi, Shah and Nadda

महत्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*