विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन अत्यंत गदारोळाचे होण्याची शक्यता आहे. प्रश्न विचारण्यासाठी पैसे प्रकरणात अडकलेल्या तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोईत्रा यांच्याबाबत सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी निर्णय घेतला जाऊ शकतो.Parliament Winter Session : Govt ready to discuss every issue, only… – Prahlad Joshi
या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या संसदीय समितीचा अहवाल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात मांडण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समितीने मोइत्रा यांची हकालपट्टी करण्याची शिफारस केली आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबरपासून सुरू होणार ; निवडणूक निकालांचा अधिवेशनावर होणार मोठा परिणाम
अधिवेशनाच्या अजेंड्यावर विचार करण्यासाठी सरकारने शनिवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी महागाई, बेरोजगारी, चिनी घुसखोरी, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर आणि मणिपूर हिंसाचार हे मुद्दे उपस्थित केले.
तर सर्व अर्थपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यास सरकार तयार आहे, मात्र विरोधकांना सभागृहात पोषक वातावरण निर्माण करावे लागेल, असे सरकारचे म्हणणे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App