राजस्थानात भाजपने रोवला यशाचा झेंडा; गेहलोतांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यात “मराठी विजयाचा” दमदार वाटा!!


विशेष प्रतिनिधी

जयपूर : तेलंगणात काँग्रेसचा विजय झाल्याबरोबर महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या नेत्यांकडे कोणकोणती जबाबदारी सोपवली??, याच्या बातम्या मराठी माध्यमांमध्ये झळकल्या. महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या नेत्यांनी कोणकोणत्या राज्यांमध्ये जाऊन प्रचार केला??, त्या प्रचाराचा नेमका किती आणि काय फायदा झाला?? याच्याही बातमी आल्या. पण त्या पलीकडे जाऊन जमिनीस्तरावर प्रत्यक्ष काम करणाऱ्या नेत्यांकडे आणि कार्यकर्त्यांकडे माध्यमांचे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष राहिले Significant contribution Marathi leader Vijaya rahatkar in rajasthan bjp victory

असे म्हणतात की, यशाला अनेक बाप असतात आणि अपयशाला कुणीही बाप नसतो. पण यशावर दावा सांगायला अनेक बाप जरी पुढे येत असले, तरी प्रत्यक्षात त्या यशासाठी जमिनी स्तरावरचे नेते आणि कार्यकर्ते अनेक दिवस अनेक वर्ष झटत असतात आणि त्याचीच फळे पक्षाला विजयाच्या रूपाने मिळतात हे दिसून येते.

राजस्थानात अशाच प्रकारे जमिनी स्तरावर काम करून भाजपने दिलेली सहभागी पदाची जबाबदारी संपूर्ण आणि 100 % न्याय देत निभावत विजया रहाटकर या मराठी महिला नेत्यांनी पूर्ण केली. पण त्याची चर्चा मराठी माध्यमांमध्ये दिसली नाही.

माध्यमांमधल्या पॉलिटिकल परसेप्शनच्या आधारे राजकीय वाटचाल करणे आणि प्रत्यक्ष बुध स्तरावर काम करणे या फरकाने काँग्रेसचा पराभव आणि भाजपचा विजय घडवून आणला. यामध्ये राजस्थानातल्या भाजपच्या विजयात भाजपच्या प्रभारी विजया राहटकर यांचा मोलाचा वाटा ठरला. राजस्थानचे सहप्रभारी पद मिळाल्यानंतर राज्याचे सतत दौरे आणि त्यातही केवळ राजधानी जयपूर मध्ये न राहता क्षेत्रफळाने सर्वांत मोठे राज्य असलेल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पोहोचणे याला त्यांनी प्राधान्य दिले

संघ आणि भाजपच्या कार्यपद्धतीनुसार डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायाला भिंगरी अशा अवस्थेत त्या राजस्थान मधल्या 44 पैकी 40 जिल्ह्यांमध्ये त्या पोहोचल्या. वेगवेगळ्या कारणांसाठी आणि मागण्यांसाठी महाराष्ट्र पिंजून काढल्याच्या बाता काही नेते मारत असतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राबाहेर जाऊन 44 पैकी 40 जिल्ह्यांमध्ये पोहोचणे याला खऱ्या अर्थाने राज्य पिंजून काढणे, असे म्हणतात, हे येथे अधोरेखित केले पाहिजे.

राजस्थान मध्ये 200 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्यापैकी प्रत्येक मतदारसंघात जाणे हे राज्यातल्या प्रदेश पातळीवरच्या मंत्र्यांना अथवा पदाधिकाऱ्यांना देखील शक्य होत नाही, पण हे विजया रहाटकरांनी सातत्यपूर्ण दौऱ्यातून साध्य केले.
200 पैकी 160 विधानसभा मतदारसंघांमध्ये त्या फिरल्या. पक्षातल्या बुथ स्तरावरच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची सतत कनेक्ट राहिल्या आणि त्या समन्वयातून बूथ स्तरावरचे फार मोठे जाळे या 160 मतदारसंघांमध्ये त्यांनी उभे केले. जिथे ते जाळे आधीच उभे होते, ते जास्त ऍक्टिव्हेट केले. त्यामुळे बुध स्तरावरच्या जाळ्याचा “पॉलिटिकल इफेक्ट” 200 मतदारसंघांमध्ये पोहोचला.

मावळते मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना जादूगार म्हटले जाते. याचा अर्थ अंतिम क्षणी निवडणूक फिरवण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे, असे “पॉलिटिकल परसेप्शन” माध्यमांनी तयार केले होते, पण ती राजकीय धारणा मोडून अशोक गेहलोत सरकारच्या कुशासनाचा पर्दाफाश करणे ही फार मोठी जबाबदारी होती. त्यासाठी राजस्थान मधल्या गावांमधली आणि तालुक्यांमधली जमिनी स्तरावरची भयानक परिस्थिती उघड्यावर आणण्याची आवश्यकता होती. ही परिस्थिती भाजप कार्यकर्त्यांनी जनतेसमोर आणण्यासाठी स्वतंत्र स्ट्रॅटेजी आखणे गरजेचे होते. ही स्ट्रॅटेजी आखण्यात विजया रहाटकर यांनी मोठी कामगिरी केली. अशोक गेहलोत सरकारच्या काळात मुस्लिम तुष्टीकरण कसे वाढले??, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किती बिकट बनला?? महिला अत्याचारांपासून पेपर लीक पर्यंतच्या घोटाळ्यांमध्ये सरकार किती चिखलात रुतले होते??, याचे वाभाडे भाजप कार्यकर्ते आक्रमकपणे काढत होते, पण या मागची स्ट्रॅटेजी ठरविण्यात विजया रहाटकरांनी बौद्धिक इंधन पुरविले.

अशोक गेहलोत सरकारचा पराभव करून आपण जिंकू शकतो हा निर्धार भाजपच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा होताच, पण त्या निर्धाराला नियोजनपूर्वक वळण लावणे, त्यासाठी बूथ समित्या मजबूत करणे, वेगवेगळ्या सामाजिक घटकांना जोडून घेणे, महिला, युवक, ओबीसी, आदिवासी आदी मोर्चांचा समन्वय साधून सातत्याने त्यांना कार्यरत ठेवणे या कामाला त्यांनी प्राधान्य दिले. त्यातून भाजपचे विविध स्तरांवरचे कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत झालेच, पण राजस्थान मधल्या प्रत्येक सामाजिक घटकापर्यंत पोहोचून त्यातल्या व्यक्ती व्यक्तीपर्यंत भाजपचा संदेश पोहोचविणे हे महत्त्वाचे काम झाले.

जोधपूर : गेहलोतांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा जोधपूर हा बालेकिल्ला. या बालेकिल्लात कोणी घुसू शकत नाही, अशी धारणा राजस्थानातल्या माध्यमांनी तयार केली होती. पण या बालेकिल्ल्याला उद्ध्वस्त करण्याचा निर्धार भाजपने केला आणि त्याची जमिनीस्तरावरची तयारी विजया रहाटकरांनी करवून घेतली. जोधपूर विभागात त्या तळ ठोकून बसल्या आणि त्याचा परिणाम दिसला. जोधपूर विभागातील 33 पैकी तब्बल 24 जागा भाजपच्या पारड्यात आल्या. 2018 मध्ये याच जोधपुर बालेकिल्ल्यात भाजपला फक्त 11 जागा मिळाल्या होत्या.

अर्थात राजस्थानात जाऊन काम करणे हे महाराष्ट्रातल्या नेत्यांसाठी नवीन नाही. भैरोसिंग शेखावत यांच्यासारखा दिग्गज नेता असताना देखील जमिनी स्तरावरचे काम करण्यासाठी अनेक नेते राजस्थानात यापूर्वी गेले आणि त्यांनी त्यावेळच्या निवडणुकांमध्ये भाजपला विजयी करण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. यात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे नेहमी आघाडीवर असायचे. तिथल्या निवडणुकांमधली रणनीती शिकून घेऊन ते ती महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये योग्य ठिकाणी अंमलात आणायचे. आज प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हयात नाहीत, पण 2023 च्या राजस्थानच्या निवडणुकीत तशाच धर्तीचे काम करून विजया रहाटकर यांनी भाजपच्या महाविजयात मोठी कामगिरी केली आहे, याची नोंद माध्यमांनी घेणे आवश्यक आहे!!

Significant contribution Marathi leader Vijaya rahatkar in rajasthan bjp victory

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात