विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थानबरोबरच छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपाने यश मिळवले आहे. यानंतर आता भाजप नेते, कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. शिवाय विविध प्रतिक्रियाही उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांनी राहुल गांधींचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.Rahul Gandhi had already predicted about Rajasthan Chhattisgarh
सच हुई राहुल जी की भविष्यवाणी pic.twitter.com/lXQJCmdHG4 — Piyush Goyal (मोदी का परिवार) (@PiyushGoyal) December 3, 2023
सच हुई राहुल जी की भविष्यवाणी pic.twitter.com/lXQJCmdHG4
— Piyush Goyal (मोदी का परिवार) (@PiyushGoyal) December 3, 2023
”राहुल गांधींची भविष्यवाणी खरी ठरली.” असं म्हणत गोयल यांनी राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना छत्तीसगड, राजस्थान निवडणुकीबाबत केलेलं विधान दर्शवलं आहे. ज्यावरून राहुल गांधी आता ट्रोल होत आहेत.
”राहुल गांधी हाजिर हों…” मानहानीच्या प्रकरणात सुलतानपूर न्यायालयाने बजावले समन्स!
”राजस्थानमध्येही सरकार जात आहे आणि छत्तीसगडमध्येही जात आहे.” असं राहुल गांधी त्या व्हिडीओमध्ये म्हणाले होते. आणि आज समोर आलेल्या निकातही तेच झालं. राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता गेली आहे. त्यामुळेच राहुल गांधींची ती भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरल्याचं बोललं जात आहे.विशेष म्हणजे राजस्थान निवडणुकीत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना पनौती म्हटलं होतं. ज्यावर भाजपने आक्षेप घेत हा मुद्दा उचलून धऱत, निवडणुकीत मुख्य मुद्दा बनवला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more