विशेष प्रतिनिधी
लखनऊ : कोट्यवधी भारतीयांचे श्रध्दास्थान असलेले अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीचा प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणखी एक महत्वाकांक्षी प्रकल्प असलेले काशी विश्वनाथ धाम मात्र २०२२ पर्यंतच पूर्ण होणार आहे.The Prime Minister’s ambitious Kashi Vishwanath Dham project will be completed before 2022
पंतप्रधानांनी मार्च 2018 मध्ये त्यांच्या संसदीय मतदारसंघात ४०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाची सुरूवात केली आहे. काशी विश्वनाथ मंदिराच्या भोवती त्याचे काम सुरू आहे. सध्याच्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे, मंदिर परिसरात नवीन सुविधा पुरवणे, मंदिराच्या सभोवतालच्या वाहतुकीचे नियोजन करणे. आणि मणिकर्ण गंगा घाटासह मंदिराला एका कॉरीडॉरने जोडण्यात येणार आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी 1 ऑगस्टला वाराणसीला भेट देऊन या प्रकल्पाचा आढावा घेतला होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही वाराणसीला भेट दिली होती.श्री काशी विश्वनाथ क्षेत्र विकास परिषद बोडार्ने गुरुवारी काशी विश्वनाथ धाम प्रकल्पाच्या माध्यमातून नियोजनबध्द विकास आराखडा करण्यासाठी एक खासगी सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत.
प्रकल्प वेळेपूर्वीच पूर्ण होण्याच्या टप्यावर आहे. पायाभूत सुविधा नोव्हेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होतील. यावर देखरेख ठेवण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे.उत्तर प्रदेशच्या निवडणुकीपूवी मंदिर प्रकल्पाचे भव्य उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App