विशेष प्रतिनिधी
मुंबई : वेगवेगळ्या योजना आणून विमान प्रवासाचे दर कमी करणे आता कंपन्यांना शक्य होणार नाही. त्याचबरोबर मागणी वाढल्याने अवाच्या सवा दरही लावणार नाही. केंद्र सरकारने विमानाचे किमान आणि कमाल दर निश्चित केले आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने शुक्रवारी विमान तिकीट दरांच्या किमान आणि कमाल मर्यादेत ९ ते १२ टक्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबई-दिल्ली प्रवासासाठी आता किमान ५ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. Air travel will become more expensive, fares will increase by 9 to 12 per cent, Mumbai-Delhi travel will cost at least five thousand
इंधन दरवाढ आणि सुरक्षा शुल्काच्या भारामुळे आधीच महागलेला विमान प्रवास आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. लॉकडाऊननंतर देशांतर्गत विमानसेवा सुरू करताना सरकारने विमान तिकिटांचे कमाल आणि किमान दर निश्चित केले होते. त्यानुसार निश्चित रकमेपेक्षा कमी किंवा जादा भाडे विमान कंपन्यांना आकारता येणार नाही, असे आदेश जारी करण्यात आले होते. मे २०२० पासून आतापर्यंत चार वेळा दरांत वाढ करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
प्रवाशांना या वाढीव दरांवर जीएसटी, प्रवासी सुरक्षा शुल्क, विकास शुल्क आणि इतर कर अशी अतिरिक्त रक्कम द्यावी लागणार आहे. त्यामुळे आता मुंबई ते दिल्ली प्रवासासाठी जवळपास ५ हजार रुपये मोजावे लागतील असाअंदाज आहे. त्याचबरोबर विमान प्रवासासाठी लागणाºया वेळेप्रमाणे भाडे निश्चित करण्यात आले आहे. ४० मिनिटांच्या प्रवासासाठी किमान भाडे २९०० आणि कमाल भाडे ८८०० रुपये असेल. ४० ते ६० मिनिटांसाठी किमान ३,७०० आणि कमाल ११,००० रुपये असणार आहे. ६० ते ९० मिनिटांसाठी ४,५०० आणि १३,२००, ९० ते १२० मिनिटांसाठी ५,३०० आणि १४,६०० रुपये दर आकारले जाणार आहेत.
Air travel will become more expensive, fares will increase by 9 to 12 per cent, Mumbai-Delhi travel will cost at least five thousand
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App