कंगनाने ‘धाकड’ची शूटिंग पूर्ण होताच शेअर केले बोल्ड फोटोज, रिव्हिलिंग ड्रेसमुळे युजर्सकडून झाली ट्रोल

Kangana Ranaut Shares Bold Pictures After Dhaakad Wrap Party Gets Trolled

Kangana Ranaut Shares Bold Pictures : बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत तिच्या फटकळ बोलण्याबद्दल ओळखली जाते. प्रत्येक बाबतीत आपले मत मांडण्यापासून ती मागे हटत नाही. कंगना सध्या तिच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. अलीकडेच कंगनाच्या आगामी ‘धाकड’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. यावेळी कंगनाने रॅपअप पार्टीचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. हे अत्यंत बोल्ड फोटोज पाहून युजर्सनी कंगनानी ट्रोल करायला सुरुवात केली आहे. Kangana Ranaut Shares Bold Pictures After Dhaakad Wrap Party Gets Trolled


विशेष प्रतिनिधी

मुंबई : बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत तिच्या फटकळ बोलण्याबद्दल ओळखली जाते. प्रत्येक बाबतीत आपले मत मांडण्यापासून ती मागे हटत नाही. कंगना सध्या तिच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. अलीकडेच कंगनाच्या आगामी ‘धाकड’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. यावेळी कंगनाने रॅपअप पार्टीचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. हे अत्यंत बोल्ड फोटोज पाहून युजर्सनी कंगनानी ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

कंगना सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. रोजच काही पोस्ट तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत राहते. कंगना आगामी धाकड चित्रपटात पूर्ण अॅक्शन अवतारात दिसणार आहे. कंगनाने अलीकडेच शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर ट्रोलिंगला कारणीभूत ठरले आहेत.

कंगनाचा बोल्ड लूक

कंगनाने आता जे फोटो शेअर केले आहेत, त्यात ती अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. कंगनाच्या फोटोंमध्ये बॅक्रग्राउंडला सूर्यास्त दिसत आहे. ती एका तलावाच्या काठावर उभी आहे. कंगनाने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचे ब्रालेट घातली आहे. कंगनाने स्टाईल वाढवण्यासाठी तिच्या केसांचा अंबाडा बनवला आहे आणि गळ्यात सोन्याची साखळी लावून तिचा लुक पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना कंगनाने गालिबचा शेर लिहिला आहे, मोहब्बत में नहीं है फर्क जीने और मरने का, उसी को देखकर जीते हैं जिस काफिर पर दम निकले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

युजर्सकडून ट्रोलिंग

हा अवतार पाहून काही चाहते कंगनाचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे काहीजण अभिनेत्रीवर टीकाही करत आहेत. अभिनेत्रीला ट्रोल करताना एका युजरने लिहिले की मॅडम, तुम्ही इतरांच्या पोस्टवर कमेंट करता, ही पोस्ट अपलोड करताना तुम्हाला काही वाटले नाही का?, यासोबतच दुसऱ्या एका युजरने लिहिले – मॅडम, तुम्ही ही पारदर्शक ब्रा का घातली आहे?

‘धाकड’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास हा चित्रपट रजनीश राजी घई यांनी दिग्दर्शित केला आहे. कंगनाचा हा चित्रपट स्पाय थ्रिलर आहे. कंगना यात एजंट अग्नीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता मुख्य भूमिकेत आहेत. धाकड व्यतिरिक्त, कंगनाकडे ‘थलाईवी’, ‘तेजस’ आणि ‘मणिकर्णिका रिटर्न्स : द लीजेंड अँड दिद्दा’देखील आहेत.

Kangana Ranaut Shares Bold Pictures After Dhaakad Wrap Party Gets Trolled

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण