Independence Day: 75व्या स्वातंत्र्यदिनापूर्वी राजनाथ सिंहांकडून विविध कार्यक्रमांची सुरुवात, पाक-चीनलाही दिला कठोर संदेश

Defence minister Rajnath Singh launches various events to mark Independence Day

Independence Day : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी संरक्षण मंत्रालय (एमओडी) आणि सशस्त्र दलांनी भारताच्या 75व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांची सुरुवात केली. यादरम्यान राजनाथ सिंह म्हणाले, ‘2047 पर्यंत स्वातंत्र्याचा 100 वर्ष पूर्ण झाल्यावर आपण कोणत्या प्रकारचा भारताचे निर्माण करू? आपल्याला ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ निर्माण करायचे आहे. एक समृद्ध, स्वावलंबी, स्वाभिमानी भारत, जे इतर कोणत्याही देशावर हल्ला करत नाही, परंतु आपल्यावर वाईट नजर टाकणाऱ्या कोणत्याही देशाला चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे.” Defence minister Rajnath Singh launches various events to mark Independence Day


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी संरक्षण मंत्रालय (एमओडी) आणि सशस्त्र दलांनी भारताच्या 75व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांची सुरुवात केली. यादरम्यान राजनाथ सिंह म्हणाले, ‘2047 पर्यंत स्वातंत्र्याचा 100 वर्ष पूर्ण झाल्यावर आपण कोणत्या प्रकारचा भारताचे निर्माण करू? आपल्याला ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ निर्माण करायचे आहे. एक समृद्ध, स्वावलंबी, स्वाभिमानी भारत, जे इतर कोणत्याही देशावर हल्ला करत नाही, परंतु आपल्यावर वाईट नजर टाकणाऱ्या कोणत्याही देशाला चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे.”

भारताची पर्वतांवर मोहीम

राजनाथ सिंह म्हणाले की, 75 वर्षांपूर्वी भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांनी गरज पडल्यावर पर्वतांमध्ये आश्रय घेतला होता आणि आज भारत त्याच पर्वतांवर मोहीम राबवत आहे. संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, भारतीय तटरक्षक दल (आयसीजी) ‘आझादी का अमृत महोत्सव’ या दिवशी 15 ऑगस्ट रोजी 100 द्वीपांवर तिरंगा फडकवणार आहे. यादरम्यान राजनाथ सिंह स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त विविध उत्पादने आणि सुविधा लॉन्च करतील.

‘हल्ल्यानंतर देशातील क्षमता वाढली’

राजनाथ सिंह म्हणाले, “आझादीचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने हे कार्यक्रम आयोजित केले आहेत. यात सर्व विभागांच्या एकत्रित प्रयत्नांचा समावेश आहे. राष्ट्रीय चेतना आणि राष्ट्रीय स्वाभिमानाची भावना ही सर्वात शक्तिशाली भावना आहे. यासोबत राजनाथ सिंह यांनी सैन्याच्या पर्वत मोहिमेला झेंडा दाखवला. यावेळी उपस्थित असलेले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत म्हणाले, “स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाला अनेक हल्ल्यांना सामोरे जावे लागले. त्यानंतर आम्हाला आमच्या सशस्त्र दलांची आणि इतर सुरक्षा यंत्रणांची एकत्र काम करण्याची क्षमता वाढवावी लागली. आपला देश शांतताप्रिय राष्ट्र आहे, पण आम्हाला काही परिस्थितीला सामोरे जावे लागले आणि आम्हाला आमच्या सैन्याला युद्धासाठी प्रशिक्षित करावे लागले.

भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय लष्कर आणि संरक्षण मंत्रालय आणि इतर विविध संघटना देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत.

Defence minister Rajnath Singh launches various events to mark Independence Day

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात