वाराणसीतील ग्यानवापी मशीदीकडून काशी विश्वनाथ मंदिराला जमिनीच्या मोबदल्यात जमीन दान!


विशेष प्रतिनिधी

वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसीतील ग्यानव्यापी मशीद समितीकडून मशीदीबाहेरील १,७०० चौरस फूट जागा काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टला देण्यात आली. मंदिराकडून मिळालेल्या एक हजार चौरस फूट जमिनीच्या बदल्यात मशीदीकडून ही जागा देण्यात आली. Mosque – Temple dispute resolved in varanasi

मंदिराला दिलेली जागा वक्फ बोर्डाची मालमत्ता आहे. ती विकत घेता येऊ शकत नसल्याने समान किंमतीची जमीन मशीद समितीला देण्यात आली.गेल्या दोन दशकांपासून मंदिर व मशीदीदरम्यान जमिनीवरून वाद सुरू होता. तो सोडविण्यासाठी, नुकतेच एप्रिलमध्ये वाराणसी न्यायालयाने मंदिर व मशीदीचे पुरातत्व सर्वेक्षण करण्याचा आदेश यासंदर्भातील याचिकेदरम्यान दिला होता.मुघल साम्राज्यात मंदिर पाडून मशीद बांधल्याचा आरोप १९९१ मध्ये दाखल केलेल्या या याचिकेत करण्यात आला होता. सध्या ग्यानवापी मशीद उभी असलेल्या जागेवर प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली होती. दोन्ही जागांचे मूल्य सारखेच असल्याची माहिती काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील वर्मा यांनी दिली.

Mosque – Temple dispute resolved in varanasi

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”