लडाखमधील तणावात्मक परिस्थिती आणि इतर प्रश्नांच्या आधारावर सीडीएसपदी जनरल नरवणे यांची नियुक्ती करण्यात येण्याची अधिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. The new CDS will be headed by Army Chief General Narwane
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे ८ डिसेंबरला तामिळनाडूत हेलीकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर पुढील सीडीएस कोण होणार याबाबत चर्चा आहे.मात्र सीडीएस होण्यासाठी चीफ ऑफ स्टाफ कमिटीचा अध्यक्ष व्हावे लागते.दरम्यान यावेळी लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांच्या चीफ ऑफ स्टाफ डिफेंस (सीडीएस) होण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे.
जनरल नरवणे यानी चीफ ऑफ स्टाफ कमिटीचा पदभार स्वीकारला आहे. या कमिटीमध्ये तिन्ही दलांचा समावेश असतो. नरवणे सर्व सेनाप्रमुखांमध्ये वरिष्ठ असल्यामुळे त्यांना सीडीएस कमिटीच्या चेयरमनपदी नियुक्त करण्यात आलं आहे.जनरल नरवणे हे तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांमध्ये सर्वाधिक वरिष्ठ जनरल आहेत. लडाखमधील तणावात्मक परिस्थिती आणि इतर प्रश्नांच्या आधारावर सीडीएसपदी जनरल नरवणे यांची नियुक्ती करण्यात येण्याची अधिक शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जनरल मनोज मुकुंद नरवणे हे देशाचे २८ वे लष्करप्रमुख आहेत. मनोज नरवणे यांचे पुण्यातील ज्ञानप्रबोधीनी शाळेत सुरुवातीचे शिक्षण झाले.पुण्यातील एनडीएमधून त्यांनी लष्कराचे शिक्षण घेतलं.एनडीएनंतर त्यांनी डेहरादूनच्या इंडियन मिलिटरी अकादमीत प्रशिक्षण घेतलं.जून १९८० मध्ये सातव्या शीख लाईट इन्फंट्रीमध्ये भरती झाले. नंतर आसाम रायफल्सचे महानिरीक्षक, जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्सचे प्रमुख म्हणून काम केले.
ईशान्य भारत आणि जम्मू काश्मीरमध्ये बंडखोरांविरुद्ध कारवाई करण्याचा अनुभव देखील नरवणेंना आहे.३९ वर्षांच्या लाष्करी सेवेत राष्ट्रीय रायफल्स, स्ट्राईक कॉर्प्स, लष्करी प्रशिक्षण कमांडचं नेतृत्व केलं.जनरल नरवणेंना कारगिल युद्धाचा अनुभव आहे.
नरवणे यांनी सप्टेंबर 2019 मध्ये लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी लष्कराच्या पूर्व कमांडचे नेतृत्व केले. जी चीनसोबतच्या 4000 किमी लांबीच्या भारतीय सीमेवर काम करते. .
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App