सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वाची सुनावणी घेत राज्यात बंदी घातलेल्या बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत राज्य सरकारने याचिका दाखल केली होती. यावर आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेतली. याआधीच्या सुनावणीदरम्यान इतर राज्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यांना उत्तर देण्यासाठी वेळही देण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने 2017 मध्ये बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. Big news conditional permission for bullock cart race in the state, important decision of the Supreme Court
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वाची सुनावणी घेत राज्यात बंदी घातलेल्या बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत राज्य सरकारने याचिका दाखल केली होती. यावर आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेतली. याआधीच्या सुनावणीदरम्यान इतर राज्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यांना उत्तर देण्यासाठी वेळही देण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने 2017 मध्ये बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती.
या महत्त्वाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती अजय खानविलकर, न्यायमूर्ती सी टी रविकुमार आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या त्रिसदस्यीय पीठासमोर सुनावणी झाली. राज्य सरकारच्या वतीने मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. बैल हा धावणारा प्राणी आहे की नाही याबाबत राज्य सरकारने स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीच्या अहवालाद्वारे त्यांनी काही मुद्दे मांडले. यानंतर पेटा या संस्थेच्या वतीने बैल हा धावू शकणारा प्राणी नाही, बैलाचे पोट मोठे आहे. त्यामुळे तो धावू शकत नाही, असा युक्तिवाद पेटाचे वकील ग्रोव्हर यांनी केला होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या या महत्त्वाच्या निकालामुळे राज्यातील बैलगाडा शर्यतीच्या रसिकांना, बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. इतर दोन राज्यांत अशा शर्यतींचे आयेाजन होते, मग महाराष्ट्रातच बंदी का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. हाच मुद्दा ग्राह्य धरत सर्वोच्च न्यायालयाने या शर्यतींवरील बंदी उठवली आहे. यामुळे आता राज्यात बैलगाडा शर्यतींच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, ही बंदी उठवण्याबाबत विधानसभेपासून लोकसभेपर्यंत मागणी झाली. घोडे-बैलांवरील अत्याचार थांबावेत, म्हणून एकाच गाडीला घोडा-बैल जुंपण्यास बंदी होती. शर्यतीत बैलांना चाबकाने, मोठ्या काठीने अमानुष मारणे, बॅटरीचा शॉक देणे, टोकदार खिळे लावणे, असे अत्याचार होतात, असे आरोपक रत प्राणीमित्रांनी शर्यतींवर बंदी घालण्याची मागणी केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App