… याची खात्री करण्यासाठी दोन्ही बाजूंनी पडताळणी पेट्रोलिंग देखील केले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : India-China पूर्व लडाखमधील डेमचोक आणि डेपसांग भागात आठवड्यातून एकदा गस्त घालण्यात येईल. यावर भारतीय आणि चिनी सैन्याने सहमती दर्शवली आहे. दोन्ही सैन्याने याआधीही एकदा ही गस्त घातली आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात दोन्ही देशांच्या सैन्याच्या माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही बाजूंनी गस्त घालण्यात आली आहे.India-China
संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंनी परस्पर समन्वयाने आठवड्यातून एकदा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर डेपसांग आणि डेमचोक येथे गस्त घालण्याचे मान्य केले आहे. प्रत्येक भागात भारतीय लष्कर एकदा तर चिनी लष्कर एकदा गस्त घालणार आहे.
जून 2020 पासून गेल्या चार वर्षात राजकीय, राजनैतिक आणि लष्करी स्तरावर झालेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर, दोन्ही देशांमधील पाच ठिकाणांपैकी तोडगा न निघालेली डेमचोक आणि डेपसांग येथून सैन्य हटविण्यावर सहमती झाली आहे.
आता साप्ताहिक गस्त केल्यानंतरही, भारत आणि चिनी बाजू या भागात नियमित अंतराने ग्राउंड कमांडर स्तरावर चर्चा सुरू ठेवतील. परस्पर संमतीनंतर, तात्पुरते बांधकाम पूर्णपणे माघारी घेऊन नष्ट केले गेले आहे. याची खात्री करण्यासाठी दोन्ही बाजूंनी पडताळणी पेट्रोलिंग देखील केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App