2024 च्या निवडणुकीपूर्वी ‘NDA’ची ही पहिलीच बैठक होती.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एनडीएच्या खासदारांची सोमवार, 31 जुलै रोजी दिल्लीत बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. बैठकीत सहभागी खासदारांनी सांगितले की 2024 च्या निवडणुकीपूर्वी एनडीएची ही पहिलीच बैठक होती. The first meeting of NDA MPs held under the chairmanship of Prime Minister Modi discussed about Lok Sabha Elections 2024
या बैठकीत मोदींनी विरोधी पक्षांच्या आघाडीवरही निशाणा साधला. यूपीएचे नाव बदलून I.N.D.I.A असे नाव ठेवण्याबाबत ते म्हणाले, “यामुळे त्यांच्या जुन्या कार्यकाळातील पापं लपून राहणार नाहीत.”
याचबरोबर बैठकीबाबत भाजपाचे खासदार सुब्रत पाठक यांनी सांगितले की, एनडीएला 25 वर्षे पूर्ण झाल्याने एक उत्सव म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी बैठकही झाली यामध्ये पंतप्रधान मोदींनीही चर्चा केल्याचे ते म्हणाले. एनडीएची आघाडी कोणत्याही स्वार्थासाठी झालेली नाही. पंतप्रधान मोदींनी आम्हाला पुढील रणनीतीवर कसे काम करायचे याचे मंत्र दिले.
भाजप खासदार संजीव बल्यान यांनी माहिती दिली की, “एनडीएची ही पहिली बैठक होती ज्यात पंतप्रधान मोदी, भाजपा प्रमुख जेपी नड्डा उपस्थित होते. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांबाबत चर्चा झाली आणि आम्ही (एनडीए) मोठ्या बहुमताने विजयी होऊ.”
बैठकीत खासदारांना एनडीएच्या २५ वर्षांच्या इतिहासाची माहिती देण्यात आली. एक व्हिडिओ सादरीकरण देण्यात आले, ज्यामध्ये यूपी सरकार आणि केंद्र सरकार करत असलेल्या कामांची माहिती देण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more