2015 मधले भाकीत 2023 मध्ये ठरले खरे; देशातले सर्वांत मोठे राजकीय हवामान तज्ञ आज मोदींबरोबर व्यासपीठावर!!


नाशिक : 2015 मधले भाकित 2023 मध्ये ठरले खरे; देशातले सर्वात मोठे राजकीय हवामान तज्ञ आज मोदींबरोबर व्यासपीठावर दिसणार आहेत!! PM Modi predicted sharad pawar as political Meteorologist in 2015, it has come true in 2023

लोकमान्य टिळक पुरस्कार सन्मान सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर शरद पवार व्यासपीठावर दिसणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत मोदींना लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

मात्र या सोहळ्यात शरद पवारांनी मोदींबरोबर व्यासपीठावर बसणे हा महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीत सर्वांत मोठा वादग्रस्त विषय ठरला आहे. तरीदेखील त्या पलीकडे जाऊन मोदी – पवार राजकीय कॉम्बिनेशनचा विचार केला, तर मोदींचे 2015 मधले भाकीत 2023 मध्ये खरे ठरले, असे म्हणावे लागेल.

 पवारांचा 75 चा सत्कार

2015 मध्ये पवारांच्या 75 च्या सत्कारात पंतप्रधान मोदींनी पवारांचा उल्लेख देशातले सर्वात मोठे राजकीय हवामान तज्ञ अशा गौरवपूर्ण शब्दांनी केला होता. देशात राजकीय हवा कशी आणि कोणत्या दिशेने वाहते आहे, हे पवारांना बाकी कोणत्याही नेत्यापेक्षा चटकन उमगते, अशी स्तुतिसुमने मोदींनी विज्ञान भवनातील कार्यक्रमात उधळली होती. त्यानंतर मोदींनी बारामतीत येऊन पवार आपले राजकीय गुरू आहेत, असे वक्तव्यही केले होते. मोदींच्या या वक्तव्याचे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी राजकीय भांडवल देखील केले.

पण दरम्यानच्या काळात दिल्लीतल्या यमुनेतून आणि बारामतीच्या कऱ्हेतून बरेच राजकीय पाणी वाहून गेले. त्या काळात मोदींनी 2015 मध्ये केलेले राजकीय भाकीतही अनेकांच्या विस्मरणात गेले. पण हेच भाकीत 2023 मध्ये खरे ठरले आहे.



देशातले सर्वात मोठे राजकीय हवामान तज्ञ या लौकिकाला साजेल असे राजकीय हवामान पवारांनी ओळखले आहे आणि म्हणूनच आज ते मोदींबरोबर व्यासपीठावर दिसणार आहेत.

भले लोकमान्य टिळक पुरस्काराचे व्यासपीठ व्यापक आणि विस्तृत असेल, पण ते राजकीय नाही असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. त्यामुळे या राजकीय व्यासपीठावर मोदी आणि पवार एकत्र दिसणे हेच सध्याच्या विरोधी पक्षांना विशेषत: काँग्रेसला प्रचंड डाचले आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी पवारांच्या मोदींबरोबरच्या व्यासपीठावर बसण्याला तीव्र विरोध चालवला आहे. त्यांना ठाकरे गटाची, आम आदमी पार्टीची आणि पुण्यातल्या शरदनिष्ठ राष्ट्रवादीची साथही मिळाली आहे. इतकेच काय पण पुण्यातल्या काही पुरोगामी संघटनांनी देखील पवारांनी मोदींच्या कार्यक्रमाला जाऊ नये, असे त्यांना साकडे घातले आहे. पण या सर्वांचा विरोध डावलून पवार मोदींबरोबर व्यासपीठावर बसणार आहेत.

याचा अर्थच पवारांनी आपल्या लौकिकानुसार राजकीय हवा ओळखली आहे आणि ती राजकीय हवा निश्चितपणे काँग्रेस प्रणित “इंडिया” आघाडीची नसून, ती मोदी भाजप प्रणित “एनडीए” आघाडीची आहे, हे त्यांच्या लक्षात आले आहे.

पवारांचा राजकीय गुण ओळखला

एक प्रकारे शरद पवारांची ही राजकीय अपरिहार्यचा देखील आहे. आपल्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत पवार एकतर सत्तेवर राहिले किंवा सत्तेच्या वळचणीला राहिले. ही त्यांची राजकीय सवय आहे. त्या पलीकडे जाऊन पवारांनी कोणते फार मोठे राजकारण साध्य केले, असे दिसत नाही. पवारांचा हा राजकीय गुण ओळखूनच मोदींनी पवारांच्या बाकी कोणत्याही गुणांचा उल्लेख न करता ते फार मोठे राजकीय हवामान तज्ञ आहेत, अशा मोजक्याच शब्दांत स्तुती केली होती. ती स्तुती आज एक ऑगस्ट 2023 रोजी लोकमान्य टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरी ठरत आहे!!

PM Modi predicted sharad pawar as political Meteorologist in 2015, it has come true in 2023

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात