विशेष प्रतिनिधी
पाटणा : नेत्यांच्या बैठकीच्या दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षाच्या एका महिला आमदाराला तुम्ही खूप सुंदर दिसता असे म्हटले. या टिप्पणीमुळे अस्वस्थ झालेल्या या महिला आमदारांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे. २९ नोव्हेंबरला झालेल्या या बैठकीत हा प्रकार घडला.The Chief Minister told the women MLAs that you look beautiful, the MLA complained directly to the party leaders
२९ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळाची बैठक झाली. यामध्ये भाजपा, जेडीयूसह अन्य काही पक्षांचे आमदार सहभागी झाले होते. या बैठकीदरम्यान अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या दरम्यान बिहारमधल्या एकमेव आदिवासींसाठी राखीव असलेल्या जागेवर निवडून आलेल्या भाजपा आमदार निक्की हेम्ब्रम यांनीही आपला मुद्दा मांडला. आदिवासींना आपल्या उदरनिवार्हासाठी महुआ गोळा करणे आणि त्याची साठवणूक करण्याला परवानगी देण्याची मागणी केली.
त्यांच्या या मागणीनंतर नितीश कुमार म्हणाले, तुम्ही खूप सुंदर दिसता पण तुमचे विचार मात्र पूर्णत: वेगळे आहेत. तुम्हाला माहित आहे का की आम्ही अनुसूचित जाती-जमातींसाठी काय काय केलं आहे? तुम्ही तुमच्या विधानसभा क्षेत्रात जात नाही. मुख्यमंत्री नितीश कुमार असे म्हणताच बैठकीला उपस्थित असलेले सर्वजण हसू लागले, मात्र निक्की हेम्ब्रम यांना मात्र अवघडल्यासारखं झालं.
हेम्ब्रम यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या या प्रतिक्रियेमुळे त्या काही काळ स्तब्ध झाल्या आणि त्यांना सावरायला थोडा वेळ लागला. त्या म्हणाल्या, मला खूप अवघडल्यासारखं झालं. बहुतेक त्यांना माझ्या चिंतेचा मुद्दा कळला नसावा, पण त्यांनी जे शब्द वापरले त्यामुळे त्यांनी एका मला अक्षरश: कोर्टात जाब विचारायला उभं केल्यासारखं वाटलं.
आम्ही त्यांना राज्याचे प्रमुख आणि आमचे रक्षणकर्ते मानतो, पण त्यांचं हे वागणं योग्य नव्हतं. त्यांनी मला चेष्टेचा आणि विनोदाचा विषय बनवलं. लोक माझ्यावर हसत होते. हे पुरुषांचं जग आहे. एका महिलेला आपला स्वाभिमान आणि आपल्या परिवाराची प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि सावध राहिलं पाहिजे.
या प्रकाराची तक्रार निक्की हेम्ब्रम यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली असून आता मी हे प्रकरण त्यांच्या ताब्यात दिल्याचे त्या म्हणाल्या. मी पक्षश्रेष्ठींकडून केल्या जाणाºया कारवाईची वाट पाहीन आणि त्यांनी कारवाई केल्यानंतरच पुढची पावले उचलेन, असंही हेम्ब्रम यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App