केंद्र सरकारचा ट्विटरला अल्टीमेटम, नियम मान्य केले नाहीत तर भारतीय कायद्यानुसार परिणाम भोगण्यासाठी तयार राहण्याचा इशारा

भारतीय कायदे मानण्यास नकार देणाऱ्या ट्विटरला केंद्र सरकारने अखेरचा अल्टीमेटम दिला आहे. केंद्र सरकारकडून ट्विटरला अखेरची नोटिस जारी करण्यात आली आहे. या नोटिशीत ट्विटरला स्पष्ट शब्दात इशारा देण्यात आला आहे. ट्विटरने नियम मान्य करावेत अन्यथा भारतीय कायद्यानुसार, परिणाम भोगण्यासाठी तयार रहावे, असे या नोटिशीत म्हणण्यात आले आहे. The central government has given an ultimatum to Twitter, warning it to be prepared to suffer the consequences under Indian law if it does not accept the rules


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय कायदे मानण्यास नकार देणाºया ट्विटरला केंद्र सरकारने अखेरचा अल्टीमेटम दिला आहे. केंद्र सरकारकडून ट्विटरला अखेरची नोटिस जारी करण्यात आली आहे. या नोटिशीत ट्विटरला स्पष्ट शब्दात इशारा देण्यात आला आहे. ट्विटरने नियम मान्य करावेत अन्यथा भारतीय कायद्यानुसार, परिणाम भोगण्यासाठी तयार रहावे, असे या नोटिशीत म्हणण्यात आले आहे.

केंद्र सरकारने 25 फेब्रुवारीला आयटी नियम तयार केले होते. या आयटी नियमांमध्ये सरकारने स्पष्ट केले होते, की ज्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर 50 लाखांपेक्षा अधिक युझर्स असतील, त्यांना भारतात तक्रार अधिकाºयाची नियुक्ती करावी लागेल. यासाठी तीन महिन्यांचा कालावधीही देण्यात आला होता. 25 मे रोजी ही मुदत संपली आहे. गेल्या आठवड्यात ट्विटरकडून दिल्ली उच्च न्यायालयात, 28 मे रोजी तक्रार अधिकाºयाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, यावर सरकार समाधानी नाही.



आयटी मंत्रालयाने नियमांसंदर्भात 26 मेरोजी पहिल्यांदाच ट्विटरला नोटीस पाठवली होती. यानंतर 28 मे आणि 2 जूनलाही नोटिस जारी करण्यात आली होती. आता यासंदर्भात शनिवारी शेवटची नोटीस पाठवण्यात आली आहे. ट्विटरच्या उत्तरावर सरकार असमाधानी आहे. कारण, ट्विटरकडून भारतात ज्या तक्रार अधिकाऱ्याची आणि नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली, ते ट्विटरचे कर्मचाही नाहीत. याशिवाय कंपनीने अपना पत्ता म्हणून लॉ फर्मच्या ऑ फिसचा पत्ता दिला आहे. तो नियमांप्रमाणे वैध नाही, असे आयटी मंत्रालयाच्या वतीने पाठविण्यात आलेल्या या नोटिशीत म्हटले आहे.

केंद्र सरकारतर्फे पाठविण्यात आलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, भारत सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. येथे मोकळ्या मनाने ट्विटरचा स्वीकार करण्यात आला. मात्र, येथे 10 वर्ष काम करूनही ट्विटरला अशी कुठलीही यंत्रणा तयार करता आली नाही, ज्याद्वारे भारतातील नागरिकांना आपल्या तक्रारी सोडविता येतील. ज्या लोकांना ट्विटर प्लॅटफॉर्मवर अपशब्दांचा अथवा लैंगिक गैरवर्तनाचा सामना करावा लाला आहे, त्यांना आपल्या तक्रारीच्या निराकरणासाठी यंत्रणा मिळायलाच हवी. ट्विटरला 26 मे 2021 पासूनच हे नियम मान्य करावे लागतील.

नव्या आयटी नियमांच्या पालनासाठी ट्विटरला एक अखेरची संधी दिली जात आहे. याचे पालन न केल्यास आयटी कायद्यान्वये ट्विटरवर कारवाई केली जाईल. ट्विटरने आयटी कायदा आणि भारतातील इतर कायद्यांन्वये परिणाम भोगण्यास तयार रहावे, असेही या नोटीसीत म्हटले आहे.

The central government has given an ultimatum to Twitter, warning it to be prepared to suffer the consequences under Indian law if it does not accept the rules

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात