विशेष प्रतिनिधी
लखनऊ : आम आदमी पक्ष हा भारतीय जनता पक्षाचेच प्रतिरुप आहे. त्यामुळेच हा पक्ष यात्रा-जत्रा काढत आहे, अशी टीका माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केली आहे.The Aam Aadmi Party is the counterpart of the BJP, p. Criticism of Chidambaram
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी राजधानी दिल्ली ते उत्तर प्रदेशातील अयोध्येपर्यंतच्या मुख्यमंत्री तीर्थ यात्रा कार्यक्रमाच्या पहिल्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर चिदंबरम यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.
ते म्हणाले, अनुकरण हा लांगुलचालन करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. आप जितकं जास्त भाजपाचं अनुकरण करेल, तितका तो पक्ष अधिकाधिक संदर्भहीन होत जाईल. लवकरच आप हे भाजपाचंच प्रतिरुप होऊन जाईल.
केजरीवाल यांनी २०१९ मध्ये सुरू केलेली मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना राजधानीतील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेसाठी मोफत प्रवास पॅकेज देते. दिल्लीच्या प्रत्येक मतदारसंघातील ११०० लोकांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. वर्षभरात ७७ हजार भाविक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेची सुरुवात झाल्यापासून ३५०८० लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे.
केजरीवाल यांनी ही योजना सुरू केल्यापासून ते सौम्य हिंदुत्वाचा अजेंडा राबवत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली होती. उत्तर प्रदेशमधील निवडणुकांसाठी केजरीवाल या सर्व गोष्टी करत असल्याचंही विरोधक म्हणत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App