Partha Chatterjee : शिक्षक भरती घोटाळ्यात CBIने ममता सरकारमधील माजी मंत्र्यास केली अटक

Partha Chatterjee

माजी मंत्री पार्थ चॅटर्जींच्या निकटवर्तीयांनाही अटक केली आहे.


विशेष प्रतिनिधी

कोलाकाता : प्राथमिक शिक्षक भरती घोटाळ्यात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आता पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी  ( Partha Chatterjee  ) यांना अटक केली आहे. या भ्रष्टाचार प्रकरणात चटर्जीसोबतच एजन्सीने त्याचा जवळचा सहकारी अयान शील यालाही अटक केली आहे. पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग (एसएससी) मधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

पार्थ चॅटर्जी आणि अयान शील यांना मंगळवारी विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले. प्राथमिक शिक्षक भरती घोटाळ्यात दोघांनाही अटक करण्यासाठी सीबीआयने अर्ज केला, तो न्यायालयाने मान्य केला. मात्र सीबीआयने दोघांच्याही कोठडीची मागणी केली नाही. SSC शिक्षक भरती घोटाळ्यात चॅटर्जी आणि शील यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) जुलै 2022 मध्ये अटक केली होती. तेव्हापासून दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे चॅटर्जी यांना तुरुंगाच्या रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.



पार्थ चॅटर्जीच्या दक्षिण कोलकाता येथील नाकातला येथील घरावर ईडीने छापा टाकला होता. एजन्सीने पार्थच्या जवळची समजली जाणारी अभिनेत्री अर्पिता मुखर्जीच्या टॉलीगंज आणि बेलघारिया फ्लॅटवरही छापे टाकले. अर्पिताच्या फ्लॅटमधून 21 कोटी 90 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात विदेशी चलन आणि सोन्याचे दागिनेही सापडले आहेत. ईडीने अर्पितालाही अटक केली होती. पार्थ चॅटर्जी, अयान शील यांच्याशिवाय तृणमूल काँग्रेसचे युवा नेते शंतनू बंदोपाध्याय, टीएमसी नेते कुंतल घोष यांच्यासह अनेकांना SSC भरती घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे. सध्या हे सर्व आरोपी तुरुंगात आहेत.

पार्थ चॅटर्जी आणि कुंतल घोष यांनी सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. मंगळवारी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्जल भुईया यांच्या खंडपीठाने दोघांच्या जामीन अर्जावर सुनावणी केली आणि ईडीकडून उत्तर मागितले. सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता येथील विशेष न्यायालयाला कुंतल घोषच्या जामीन अर्जावर तातडीने निर्णय घेण्यास सांगितले आहे. 2014 ते 2021 या कालावधीत एसएससीद्वारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये उमेदवारांकडून 100 कोटींहून अधिक रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप TMC नेत्यांवर आहे. सीबीआय आणि ईडी या प्रकरणाचा तपास करत आहेत. याच प्रकरणात ईडीने गेल्या वर्षी जानेवारीत घोषला अटक केली होती.

Teacher Recruitment Scam CBI Stuck Former Minister in Mamata Banerjee Government

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात