वृत्तसंस्था
चेन्नई : केंद्र सरकारने तयार केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांची अंमलबजावणी करण्यास स्पष्टपणे तमिळनाडू सरकारनेही नकार दिला आहे. देशातील सर्वच राज्यांनी हे कायदे नाकारावे म्हणून संपूर्ण देशभर ‘किसान स्वराज यात्रा’ सुरू होणार आहे. Tamilnadu also opposes agri laws
ज्या राज्यांनी केंद्राचे तिन्ही कृषी कायदे अद्याप नाकारलेले नाहीत अशा सर्वच राज्यांमध्ये किसान स्वराज यात्रा जाईल. जागतिक अहिंसा दिन (२ ऑक्टोबर २०२१) पासून संविधान दिन (२६ नोव्हेंबर २०२१) पर्यंत ही यात्रा चालेल. देशातील विविध राज्यांतून प्रवास केल्यानंतर ही यात्रा थेट राजधानी दिल्लीला धडक देईल.
सध्या जल, नदी संकट, तरुणांमधील बेरोजगारी आदी समस्यांवर आवाज उठविण्यासाठी आणि शेतकरी आंदोलनाच्या अनुषंगाने अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी किसान स्वराज यात्रेचा प्रारंभ करण्याचे ठरले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App