तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य आणि राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी केले स्पष्ट
विशेष प्रतिनिधी
अयोध्या : भव्यतेचे उदाहरण असलेल्या नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिराच्या गर्भगृहात पावसाचे पाणी टपकत असल्याच्या तक्रारीने सर्वत्र खळबळ उडाली. प्रसारमाध्यमांसोबत शेअर केलेली ही चिंता इतर कोणाची नसून रामल्लाचे प्रमुख आचार्य सत्येंद्रदास यांची होती. अशा स्थितीत ही चिंता रामभक्तांना सतावत असतानाच या तक्रारीवर रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मांडलेले स्पष्टीकरण भक्तांच्या वेदना कमी करणारे आहे. Talks about rain water dripping in the sanctum sanctorum of Ram temple are wrong
तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य आणि राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सर्वप्रथम गर्भगृहाच्या छताला गळती लागल्याच्या समस्येवर आपले मत व्यक्त केले. पाणी टपकण्याच्या चर्चा निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, मंदिर निर्माण समिती करोडो राम भक्तांना आश्वासन देऊ इच्छिते की मंदिराच्या बांधकामात कोणताही दोष नाही किंवा कोणताही निष्काळजीपणा केला गेला नाही. होय, हे शक्य आहे की मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर गूढ मंडपाचे बांधकाम अद्याप सुरू आहे आणि जोपर्यंत त्याचे शिखर पूर्णतः तयार होत नाही तोपर्यंत पाण्याचे काही शिडके तळमजल्यावर पोहोचले असतील, परंतु पाणी टकपण्याच्या चर्चा चुकीच्या आहेत. गर्भगृहात पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याबाबतही मंदिर बांधकाम समितीच्या अध्यक्षांनी खुलासा केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more