सेल्फ गोलच्या बातम्यांमध्ये “या” पॉझिटिव्ह बातम्यांकडे कोण लक्ष देणार?


सेल्फ गोलच्या बातम्यांमध्ये “या” पॉझिटिव्ह बातम्यांकडे भाजपचा आयटी सेल लक्ष देणार की नाही? असा सवाल पडला आहे. BJP IT cell must look into more positive news than making self goals

पुण्यात ड्रग्स प्रकरण झाले, त्यामध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हेच एकमेकांशी झुंजले. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकरांनी भाजपच्या आयटीसी प्रमुख श्वेता शालिनी यांच्या संदर्भात व्हिडिओ केला. श्वेता शालिनी यांनी त्यांना लीगल नोटीस पाठवली. त्या नोटीशीच्या बातमीचे मराठी माध्यमांना हातात आयते कोलीत मिळाले. भाजपच्या समर्थकांनीच श्वेता शालिनी यांना ट्रोल केल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना जाग आली. फोनाफोनी झाली. श्वेता शालिनी यांनी एक भली मोठी पोस्ट लिहून भाऊ तोरसेकर यांना पाठवलेली लीगल नोटीस मागे घेतली. पण दरम्यानच्या काळात जे काही “डॅमेज” व्हायचे होते, ते होऊन गेले होते!

पुणे ड्रग्स (Pune Drugs) प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई केली. 3 पब आणि बार ताबडतोब सील केले. बेजबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई केली. हे सगळे महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाच्या जागरूकतेमुळे घडले. ठाकरे – पवार सरकारच्या काळात गृहमंत्रालय एवढे जागृत होते का त्यावेळचे गृहमंत्री नुसतीच काठ्यांना तेल लावून ठेवायला सांगायचे आणि प्रत्यक्षात ते स्वतःच 100 कोटींच्या वसुली प्रकरणात तुरुंगात जाऊन आले.



त्या उलट पुणे ड्रग्स प्रकरणासह अनेक संवेदनशील प्रकरणांमध्ये गृह मंत्रालयाने जागरूक राहून कठोर कारवाया केल्या. अगदी पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात “बड्यां”चा देखील दबाव सहन केला नाही. पण मराठी माध्यमांनी या पॉझिटिव्ह बातम्या दिल्या नाहीत, तर त्या ऐवजी चंद्रकांतदादा आणि अजितदादा यांच्यातच कशी जुंपली, त्यामध्ये अमोल मिटकरी यांनी चंद्रकांतदादांना कसे सुनावले, याच्या मोठमोठ्या बातम्या दिल्या. या सगळ्या सेल्फ गोलच्या बातम्या होत्या.

पण त्यापलीकडे जाऊन काही पॉझिटिव्ह बातम्याही घडल्या, पण त्या माध्यमांनी दिल्या नाहीत. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेताना घटनेचे पुस्तक उंचावून दाखवले, त्याच्या बातम्या माध्यमांनी आवर्जून दिल्या, पण भाजपमधूनच अनेक नेत्यांनी खुद्द काँग्रेसनेच कशी आणि किती वेळा घटना बदलली, घटनेची पायमल्ली कशी केली, याच्या सोशल मीडियावर पोस्ट केल्या. त्याबद्दल कोणी बातम्या देण्याची तसदी घेतली नाही. त्या पलीकडे जाऊन सियाचीन सारख्या संपूर्ण बर्फाळ प्रदेशातल्या युद्धभूमीवर लष्कराने पहिला डेंटल हेल्थ चेक कॅम्प आयोजित केला. त्याकडे तर माध्यमांनी तर पूर्ण दुर्लक्ष केले.

माध्यमांनी या पॉझिटिव्ह बातम्यांकडे दुर्लक्ष करणे ही त्यांची “फितरत” आहे, पण भाजपच्या आयटी सेलने तरी या पॉझिटिव्ह बातम्यांची दखल घेतली का??, हा खरा सवाल आहे. देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या विरोधकांनी खोटा नॅरेटिव्ह चालवला, म्हणून आम्ही हरलो, असे देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाचे विश्लेषण केले. ते एकदम खरे होते. पण नुसते परखड विश्लेषण करून भागेल का?? त्या पलीकडे जाऊन काही कठोर उपाय योजना करायला नकोत का??, हा खरा सवाल आहे. अन्यथा सेल्फ गोलच्या बातम्या येत राहणार आणि सरकार करत असलेल्या कितीतरी पॉझिटिव्ह बातम्या दाबल्या जाणार!!

BJP IT cell must look into more positive news than making self goals

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात