राष्ट्रवादीच्या आमदाराच्या पुतण्यावर 304 कलमाखाली गुन्हा, पण जामिनाचा मार्ग मोकळा; पोलिसांवर आमदाराचा दबाव??


विशेष प्रतिनिधी

पुणे : शहरातील कल्याणीनगर येथील बड्या बापाचा बेटा पोर्शे कार अपघात प्रकरणात अजून अटकेत असतानाच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदाराच्या पुतण्याने बेदरकार गाडी चालवून दोघांना उडवले. त्यात एकाचा मृत्यू झाला. त्या आमदाराच्या पुतण्यावर 304 कलमाखाली गुन्हा दाखल झाला, पण तरी देखील त्याचा जामीनाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा संशय निर्माण झाला आहे. Crime under section 304 against nephew of NCP MLA

पुण्यातील खेड तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयुर मोहिते पाटील याने बेदरकार कार चालवून दोघांना उडविले. त्याने गाडीतून उतरून अपघातग्रस्तांना मदतही केली नाही त्यामुळे एका अपघातग्रस्त तरुणाचा मृत्यू झाला तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांतच त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. विशेष म्हणजे 304 अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही मयूर मोहिते पाटील याला पोलीस कोठडी न मिळाल्याने पोलिसांवर आमदारांनी दबाव आणल्याचा संशय व्यक्त होत आहे.

पुण्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडले, त्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पोर्शे कार अपघाताची आठवण पुणेकरांना झाली. कारण, अपघाताची घटना घडल्यापासून मंचर पोलिसांच्या भूमिकेवर संशय घेतला जात होता. अखेर आमदार पुतणे मयूर मोहितेची पोलीस कोठडी मिळविण्यात मंचर पोलीस अपयशी ठरल्याने, त्यावर शिक्कामोर्तब झाले. घोडेगाव न्यायालयाने मयूर मोहिते पाटीलची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्याने अपघातानंतर काही तासांतच मयुरच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला. पोलिसांनी कठोर कलमं लावून, न्यायालायत भक्कम बाजू मांडली असती तर नक्कीच मयूरला पोलीस कोठडी मिळाली असती. मात्र, सुरुवातीपासून पोलीस दबावाखाली काम करत असल्याचं आणि निःपक्षपातीपणे कारवाई करत नसल्याचं बोललं जात होतं. त्यावर, न्यायालयाने गंभीर गुन्ह्यातही आरोपीला थेट न्यायालयाीन कोठडी सुनावल्याने आता पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले.

– मयूर मोहितेची अपघातग्रस्ताला मदत नाही

मयूर मोहिते पाटील हा दारूच्या नशेत गाडी बेदरकारपणे चालवत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. अपघातानंतर मयूर मोहिते पाटील गाडीतच बसून राहिला, तो गाडीबाहेर आलाच नाही. त्याने अपघातग्रस्ताला हॉस्पिटलमध्ये न्यायला देखील मदत केली नाही, असं स्थानिकांनी सांगितले.

या सर्व चर्चांवर आमदार दिलीप मोहिते पाटलांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अपघातानंतर माझा पुतण्या पळून गेला नाही, तो दारू प्यायला नव्हता, असा दावा आमदार दिलीप मोहितेंनी केला. अपघात प्रकरणात आपण पोलिसांवर कुठलाही दबाव आणला नाही असेही दिलीप मोहिते म्हणाले होते. परंतु, प्रत्यक्षात मयूर मोहिते पाटील ला न्यायालयीन सुनावणी मध्ये न्यायालयीन कोठडी मिळाली त्याच्या विरुद्ध 304 कलमानुसार गुन्हा दाखल होऊनही पोलीस कोठडी मिळाली नाही. त्यामुळे दिलीप मोहिते पाटलांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे..

Crime under section 304 against nephew of NCP MLA

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात