मात्र, त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही take responsibility for the defeat Deputy Chief Minister Fadnavis indicated his readiness to resign
विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. यामध्ये राज्यात महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडी सरस ठरली. शिवाय, भाजपच्या जागांमध्ये मोठ्याप्रमाणावर घट झाली. आता राज्यातील भाजपच्या खराब कामगिरीची जबाबदारी घेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.
फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्रातील अशा निकालाची जबाबदारी मी घेतो कारण राज्यात पक्षाचे नेतृत्व माझ्याकडे होते. मी भाजप हायकमांडला विनंती करतो की मला सरकारमधील जबाबदारीतून मुक्त करावे जेणेकरून मी आगामी निवडणुकीत पक्षासाठी अधिक मेहनत करू शकेन.’
मात्र, त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. महाराष्ट्रात भाजपची कामगिरी खराब राहिली आणि गेल्या निवडणुकीत 23 जागा जिंकणारा भाजप यावेळी 9 जागांवर घसरला हे विशेष.
याआधी निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना, देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ‘पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला संपूर्ण बहुमत प्रदान केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसर्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत. मी त्यांचे आणि देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो ! इंडि आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, तर ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळाले, या दोन्ही राज्यातील कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो.
तसेच, ‘उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या. पश्चिम बंगालमध्ये अधिक चांगले यश मिळेल, असे वाटत होते. असे झाले असते, तर भाजपा स्वबळावर 310 च्या पुढे गेली असती. देशातील जनतेने भक्कमपणे मा. मोदीजींना साथ दिली आहे.’ असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
याशिवाय ‘संविधान बदलणार असा खोटा प्रचार करुन जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचे दुर्दैव आहे. पण, तरी निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो, तसाच स्वीकारायचा असतो. तो शिरसावंद्य मानायचा असतो. या निकालाचे सखोल चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊन, या लोकसभेची कसर भरून काढू. महाराष्ट्रातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेतले आणि ते पुढेही करणार आहेत, मी त्यांचेही मन:पूर्वक आभार मानतो !’ अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App