विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एकीकडे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात EVMs वर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांना थेट सुप्रीम कोर्टाने झापून काढले, तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांचे नेते त्याच मशीन्स विरोधात आंदोलन करण्यासाठी उभे ठाकले!! ही राजकीय विसंगती आज प्रकर्षाने समोर आली.Supreme court rejects plea against EVMs, but Congress and NCPSP voiced against manchies
सुप्रीम कोर्टामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात EVMs विरोधात अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने सुनावणी घेतली. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन टेम्पर होतात. त्याच्यामध्ये गडबड करून विशिष्ट उमेदवारांना जिंकवण्यात येते, वगैरे युक्तिवाद सुप्रीम कोर्टात EVMs विरोधकांनी केले. मात्र, तुम्ही जिंकता तेव्हा EVMs चांगली आणि तुम्ही पराभूत होता तेव्हा EVMs वाईट, असे आर्ग्युमेंट तुम्ही कसे करू शकता??, असा सवाल सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्तींच्या खंडपीठाने केला. EVMs विरोधातली याचिका त्यांनी फेटाळून लावली.
व्ही. के. पॉल यांनी संबंधित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. अमेरिकेसह 150 देशांमध्ये बॅलेट पेपर वरच निवडणुका होतात. याकडे पॉल यांनी खंडपीठाचे लक्ष वेधले होते. त्यावर खंडपीठाने तुम्हाला जगाच्या पेक्षा एखादे वेगळे तंत्रज्ञान का नको??, असा सवाल केला. चंद्राबाबू नायडू आणि जगन मोहन रेड्डी हे जेव्हा निवडणुका जिंकतात, तेव्हा EVMs विरोधात काही बोलत नाहीत, पण निवडणुका हरल्यावर तेच EVMs टॅम्पर होतात म्हणून बोलायला सुरुवात करतात, हे कसे काय चालेल??, असा बोचरा सवाल खंडपीठाने विचारला. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची याचिका सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने फेटाळून लावली.
एकीकडे सुप्रीम कोर्टाने EVMs विरोधात याचिका फेटाळताना बॅलेट पेपरवरच्या निवडणुकाही नाकारल्या, त्याच वेळी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते वेगवेगळ्या ठिकाणी EVMs विरोधामध्ये आंदोलन करण्याची भाषा करत होते.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी संविधान दिनाच्या कार्यक्रमात EVMs विरोधामध्ये देशव्यापी मोहीम चालविण्याची भाषा वापरली राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली, त्या धरतीवर काँग्रेस पक्ष संपूर्ण देशभर EVMs विरोधामध्ये आंदोलन करून निवडणुका फक्त बॅलेट पेपर वरच घ्याव्यात, अशी मागणी करण्याचा इरादा खर्गे यांनी बोलून दाखविला.
दुसरीकडे मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये झाली. त्यामध्ये देखील महाराष्ट्र विधानसभेतल्या पराभूत उमेदवारांनी EVMs विरोधामध्येच आवाज उठवला महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस EVMs विरोधामध्ये आंदोलन करेल, असे या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App