राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी, अधिवक्ता विष्णू शंकर जैन आणि इतरांनी या याचिका दाखल केल्या आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Supreme Court धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द घटनेतून काढून टाकण्याची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. माजी राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी, अधिवक्ता विष्णू शंकर जैन आणि इतरांनी या याचिका दाखल केल्या आहेत.Supreme Court
1976 मध्ये झालेल्या घटनादुरुस्तीनुसार धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद असे शब्द जोडण्यात आले होते. गेल्या शुक्रवारीच सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. याचिका फेटाळून लावताना सरन्यायाधीश म्हणाले की, ‘या याचिकेवर सविस्तर सुनावणी करण्याची गरज नाही.’ CJI म्हणाले की, ‘समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द 1976 मध्ये घटनादुरुस्तीद्वारे जोडण्यात आले होते आणि 1949 मध्ये स्वीकारलेल्या राज्यघटनेत काहीही फरक पडत नाही.’
1976 मध्ये इंदिरा गांधी सरकारने 42वी घटनादुरुस्ती करून संविधानाच्या प्रस्तावनेत ‘समाजवादी’, ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘अखंडता’ हे शब्द समाविष्ट केले होते. या दुरुस्तीनंतर प्रस्तावनेतील भारताचे स्वरूप ‘सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक’ वरून ‘सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक’ असे बदलले.
सुनावणीदरम्यान आपला युक्तिवाद सादर करताना याचिकाकर्ते अधिवक्ता विष्णू कुमार जैन यांनी नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाच्या नुकत्याच दिलेल्या निर्णयाचा हवाला दिला. घटनेच्या कलम 39(बी) वरील नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या निकालाचा संदर्भ देत ते म्हणाले की त्या निकालात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती न्यायमूर्ती व्ही आर कृष्णा अय्यर यांनी दिलेल्या “समाजवादी” शब्दाच्या व्याख्येशी सर्वोच्च न्यायालयाने असहमत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App