प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था बदलण्याची ताकद असणाऱ्या स्टार्टअप उद्योगांमध्ये भरपूर पोटेन्शियल असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. युवकांनी जास्तीत जास्त स्टार्ट योजनांमध्ये गुंतवणूक करून आपले भवितव्य घडवावे, असेही त्यांनी सांगितले आहे.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या आवाहनाला कर्नाटकची राजधानी बंगळूरूने उत्तम प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे. स्टार्ट इक्विटी फंड रेझिंगमध्ये बंगळुरूचा तब्बल 49 % मार्केट शेअर दिसून येत आहे. 2019 – 2021 या आर्थिक वर्षांमध्ये बंगळुरूने इतर शहरांवर मोठी आघाडी घेतली आहे.
स्टार्टअप इक्विटी फंड रेझिंगमध्ये दिल्ली 30%, मुंबई 14%, पुणे 3%, चेन्नई 2% एवढा मार्केट शेअर आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकता आणि अहमदाबाद यांच्यामध्ये “विलक्षण साम्य” दिसत असून या दोन्ही शहरांचा स्टार्टअप इक्विटी फंड रेझिंग मधला मार्केट शेअर 0% आहे.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या राज्यात उद्योगासाठी पोषक वातावरण असल्याचे नसल्याची टीका नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असतात. तृणमूल काँग्रेसची राजवट असताना टाटांचा नॅनो कारचा प्रकल्प सिंगूर मधून त्यांनी मुख्यमंत्री असताना स्वतः पुढाकार घेऊन गुजरातमध्ये आणून दाखवला होता. या पार्श्वभूमीवर स्टार्टअप इक्विटी फंड रेझिंगमध्ये अहमदाबाद आणि कोलकता या दोन्ही शहरांचा मार्केट शेअर 0% असणे हे “ठळकपणे” दिसून येत आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई देखील बंगळुरू आणि दिल्ली एनसीआर पेक्षा मागे पडल्याची दिसून येत असून पुण्याने स्टार्ट अप मध्ये देखील फारशी चमक दाखवली नसल्याचे स्पष्ट होत आहे. कारण पुण्याचा मार्केट शेअर फक्त 3 टक्के आहे.
Communism imposes a severe cost. For those living in Bengal, unless you make efforts to participate in the economy outside the state, you simply won’t be a part of India’s economic transformation. pic.twitter.com/hTlnxF38Yz — Rajeev Mantri (@RMantri) January 2, 2022
Communism imposes a severe cost.
For those living in Bengal, unless you make efforts to participate in the economy outside the state, you simply won’t be a part of India’s economic transformation. pic.twitter.com/hTlnxF38Yz
— Rajeev Mantri (@RMantri) January 2, 2022
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App