विशेष प्रतिनिधी
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी ( ST employees ) अखेर त्यांचा संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी कर्मचाऱ्याची बैठक पार पडली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. यात विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडे सहा हजार रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेतली. या बैठकीला एसटी कामगार संयुक्त कृती समितीचे शिष्टमंडळ उपस्थित होते. त्यासोबतच भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, वकील गुणरत्न सदावर्ते, एसटी कष्टकरी जनसंघच्या जयश्री पाटील या देखील बैठकीला उपस्थित होत्या.
Dharma Shastra : शास्त्रात अस्पृश्यतेला स्थान नाही, मग भेदाभेद अमंगळ कशासाठी??; भागवतांचा सवाल; कालसुसंगत वेदज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन!!
पडळकरांनी मानले सरकारचे आभार
आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैठकीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. भाजप नेते पडळकर म्हणाले की, सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात सरसकट 6500 रुपयांची पगार वाढ केलेली आहे. ज्यांच्या पगारामध्ये 2021 पाच हजार रुपयांची वाढ झाली होती. त्यांच्या मूळ पगारामध्ये दीड हजार रुपयांची वाढ झालेली आहे. ज्यांना चार हजारांची वाढ दिली होती, त्यांच्या पगारामध्ये अडीच हजारांची वाढ झाली आहे. ज्यांना 2021 मध्ये अडीच हजारांची वाढ झाली होती, त्यांच्या पगारात 4 हजारांची वाढ झाली आहे. मी महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या वतीने सरकारचे आभार व्यक्त करतो. सर्व संघटनांनी मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत केलं. महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे की, तुम्ही जो उस्फुर्तपणे संप पुकारला. त्या संपाला सरकारने यश दिलेले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी उद्यापासून कामावर रुजू व्हावं, अशी तुम्हाला विनंती आहे.
आंदोलक एसटी कर्मचाऱ्याच्या मूळ मागण्या
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळावं. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता मिळावा. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच घरभाडं भत्ता मिळावा. एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट 5 हजार रुपयांची वेतनवाढ मिळावी, अशा आंदोलकांच्या प्रमुख मागण्या होत्या.
काय म्हणाले संघटनेचे पदाधिकारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आम्ही आभार मानतो. ज्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही गेलो होतो, ते सढळ हस्ते पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांना मिळालं आहे. साडे सहा हजार रुपये पगारवाढ देण्याचा निर्णय झाला आहे. तसेच, गेल्या 6 महिन्यांपासून 2000 कर्मचारी घरी बसले आहेत. लहानसहान केसेससाठी घरी असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचाही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मला वाटतं हा आनंद जनतेसोबत कर्मचाऱ्यांनाही मोठा आहे. महाराष्ट्रात ही पहिली वेळ आहे, 23 संघटनांच्या कर्मचाऱ्यांची आज बैठक झाली. पुन्हा एकदा संघटनेतर्फे आम्ही राज्य सरकारचे आभार मानतो, असे संघटनेच्या पदाधिकारी यांनी म्हटलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more