विशेष प्रतिनिधी
लातूर : जिल्ह्यात २ सप्टेंबर रोजी ३२ महसूलमंडळात अतिवृष्टी झाली आहे. याअतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचीपाहणी करण्यासाठी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे, ( Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस थेट शेतकऱ्यांच्याबांधावर पोहचले. यावेळी त्यांनीउदगीर तालुक्यातील हेर आणिलोहारा शिवारातील पिक नुकसानीचीपाहणी केली, तसेच शेतकऱ्यांकडूननुकसानीची माहिती घेतली.
शेतकऱ्यांना एनडीआरएफचेनिकष बाजूला ठेवून जास्तीत जास्तनुकसान भरपाई दिली जाईल, असेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळीसांगितले. तसेच अतिवृष्टीनेझालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगानेकरून शेतकऱ्यांना लवकरातनुसकान भरपाई देण्यात येईल, असेउपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याउपस्थितीत आयोजित मुख्यमंत्रीमहिला सशक्तीकरण अभियानालाउपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेव उपमुख्यमंत्री फडणवीस हे लातूरजिल्हा दौऱ्यावर आले होते. हासमारंभ झाल्यानंतर नुकसानीचीपाहणी करण्यासाठी दोघेही थेटशेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले.
विमा कंपनीकडून 25% अग्रिम- मुंडे
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तीन प्रकारे मदतमिळणार आहे. त्यात जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांनावेगळ्या निकषाने, गुरांच्या नुकसानीसाठीवेगळी मदत व पीक नुकसानीसाठीएसडीआरएफ, एनडीआरएफच्यानिकषानुसार मदत दिली जाईल, अशीमाहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.विमा कंपनीकडून २५ टक्के अग्रिमशेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. ४ सप्टेंबररोजी पाथरी तालुक्यातील रेणापूर येथे पाहणी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more