घोष यांच्यावर वैद्यकीय महाविद्यालयातील आर्थिक अनियमिततेचा आरोप आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : आरजी कर मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष ( Sandeep Ghosh ) यांना एका व्यक्तीने चापट मारण्याचा प्रयत्न केला. जमावातील व्यक्तीकडून हा मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. तर घोष यांचा निषेध करणारे लोक ‘चोर-चोर’च्या घोषणा देत होते. घोष यांना फाशी देण्याची मागणी होत आहे. यानंतर पोलीस आणि केंद्रीय दलाने परिस्थिती नियंत्रणात आणली.
वास्तविक, घोष यांच्यावर वैद्यकीय महाविद्यालयातील आर्थिक अनियमिततेचा आरोप आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यांना मंगळवारी अलीपूर न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, जमाव त्याचा निषेध करत होता. घोष यांच्यासह चार जणांना न्यायालयाने आठ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. घोष यांना 2 ऑगस्ट रोजी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
न्यायालयाच्या निर्णयानंतर पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागाने अधिसूचना जारी केली आहे. घोष यांना कायदेशीर कारवाईमुळे निलंबित करण्यात आल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. यापूर्वी 28 ऑगस्ट रोजी आयएमईने घोष यांचे सदस्यत्व रद्द केले होते.
पोलीस आम्हाला घाबरतात
आरजीकर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचे निदर्शने २६ व्या दिवशीही सुरूच होते. बलात्कार-हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप आंदोलक डॉक्टरांनी केला आहे. आंदोलक डॉक्टरांनी पोलीस आयुक्त गोयल यांचे छायाचित्र हातात धरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच पोलिस आयुक्तांच्या पुतळ्याचे दहन केले. संपावर बसलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, कोलकाता पोलिस आम्हाला घाबरतात हे आम्हाला माहीत नव्हते. आम्हाला रोखण्यासाठी त्यांना नऊ फूट उंच बॅरिकेड उभारावे लागतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more