वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातल्या जागा वाटपाची रस्सीखेच अजूनही सुरू असतानाच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे एक महत्त्वाचे वक्तव्य समोर आले आहे. Sonia – Thackeray – Pawar meeting in Delhi 15 days ago says supriya sule
महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात 15 दिवसांपूर्वी दिल्ली चर्चा झाली होती. जागावाटपाचा विशिष्ट फार्म्युलाही त्यांनी तयार केला. त्याची अधिकृत माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवली नाही, पण आणखी 8 – 10 दिवसांत जागावाटपाचा फॉर्म्युला फायनल होऊन ती माहिती माध्यमांना दिली जाईल, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
#WATCH मुंबई: सीट शेयरिंग पर NCP सांसद सुप्रिया सुले ने कहा, "… 15 दिन पहले दिल्ली में सोनिया गांधी, उद्धव ठाकरे और शरद पवार के बीच मीटिंग हुई थी। उस मीटिंग में सीट शेयरिंग की काफी बातें साफ हुई थीं… अगले 8-10 दिन में आप तक भी जानकारी पहुंचा दी जाएगी।" pic.twitter.com/yVxyyofc3B — ANI_HindiNews (@AHindinews) January 1, 2024
#WATCH मुंबई: सीट शेयरिंग पर NCP सांसद सुप्रिया सुले ने कहा, "… 15 दिन पहले दिल्ली में सोनिया गांधी, उद्धव ठाकरे और शरद पवार के बीच मीटिंग हुई थी। उस मीटिंग में सीट शेयरिंग की काफी बातें साफ हुई थीं… अगले 8-10 दिन में आप तक भी जानकारी पहुंचा दी जाएगी।" pic.twitter.com/yVxyyofc3B
— ANI_HindiNews (@AHindinews) January 1, 2024
ठाकरे गटाने 23 आणि काँग्रेसने 22 अशा जागा लढविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 3 जागा उरल्या आहेत. त्यामुळे मूळातच महाविकास आघाडी कागदावर असली, तरी प्रत्यक्षात जागावाटप होऊन ती लोकसभा निवडणुकीपर्यंत टिकेलच याची कुठलीही गॅरंटी नाही.
दिल्लीत 2023 मधल्या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अशोक हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत 31 डिसेंबर पर्यंत “इंडिया” आघाडीचे जागावाटप निश्चित करण्याचे ठरले होते. परंतु, ती मुदत उलटल्यानंतर ही प्रत्यक्षात जागावाटप समोर आलेले नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडीतल्या 3 घटक पक्षांमध्ये जागा वाटपाची जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
ठाकरे गट 23 जागांवर ठाम आहे, तर काँग्रेसने 22 जागा लढवण्याची तयारी केली आहे. महाविकास आघाडीत टिकून राहिल्याशिवाय ठाकरे गट स्वतंत्रपणे एकही खासदार निवडून आणू शकणार नाही, असा टोला काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी लगावला. ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत शिवसेना 23 जागांवर ठाम असल्याचे सांगितले, तर प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला “बाराचा फॉर्म्युला” दिला आहे.
या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी मात्र राष्ट्रवादी नेमका किती जागा लढवणार हे गुलदस्त्यात ठेवत 15 दिवसांपूर्वी सोनिया गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची चर्चा झाली आणि आणखी 8 – 10 दिवसांनी जागा वाटपाचा फायनल फॉर्म्युला माध्यमांसमोर सांगू, असे म्हणत विषय तात्पुरता थंड्या बस्त्यात टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App