Siachen glacier : सोनिया गांधी अख्खे सियाचीन पाकिस्तानच्या घशात घालायला तयार झाल्या होत्या, भारतीय लष्कराने ते रोखले!!

माजी लष्करप्रमुख जे जे सिंग यांचा धक्कादायक खुलासा!! Sonia Gandhi tried to give Siachen glacier to Pakistan.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताच्या सुरक्षा धोरणाची आणि सीमावर्ती भागाच्या काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित सरकारांनी कसा खेळ केला, याचे हजारो किस्से आणि धक्कादायक खुलासे आत्तापर्यंत अनेक विश्वासार्ह व्यक्तींनी केले. त्यात आता आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल जे. जे सिंह यांनी एका मुलाखतीत अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे.

काँग्रेस प्रणित यूपीए सरकार केंद्रात असताना सोनिया गांधी संपूर्ण सियाचीन ग्लेशियर पाकिस्तानला द्यायला तयार झाल्या होत्या. पाकिस्तान बरोबर गुप्त समझोता करून त्यावर स्वाक्षरी करण्यासाठी सोनिया गांधींनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर दबाव आणला होता त्या दबावापुढे मनमोहन सिंग झुकले देखील होते. परंतु भारतीय लष्कराने त्यावेळच्या सरकारचे सगळे प्रयत्न हाणून पाडले त्यामुळेच सियाचीन ग्लेशियर आजही भारताच्या ताब्यात आहे, असा धक्कादायक खुलासा जनरल जे. जे. सिंग यांनी रिपब्लिक भारत टीव्हीवरच्या मुलाखतीत केला.

सियाचीन ग्लेशियर अर्थात सियाचीन परिसरातील सीमा नदी ही जगातली सर्वांत उंच युद्धभूमी मानली जाते. त्या युद्धभूमीवर भारत पाकिस्तान आणि चीन यांची सैन्ये एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत. त्यातही चीनचा पाकिस्तानला सर्व प्रकारचा पाठिंबा आहे, पण तरी देखील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय लष्कर सियाचिन ग्लेशियर मध्ये कणखरपणे पाय रोवून उभे आहे.

सियाचिन ग्लेशियर हा वादग्रस्त भाग आहे. तिथे भारतीय लष्कराचा प्रचंड खर्च होतो आणि प्रत्यक्षात त्या ग्लेशियरचा भारताला कुठल्याच प्रकारचा उपयोग मात्र काही होत नाही, असा युक्तिवाद काँग्रेस प्रणित सरकारांनी अनेकदा केला. तोच युक्तिवाद पुढे रेटत सोनिया गांधींनी संपूर्ण सियाचीन ग्लेशियर पाकिस्तानला देण्याचे कारस्थान रचले होते. त्यासाठी त्यांनी अमेरिकन – पाकिस्तानी लॉबी कामाला देखील लावली होती. त्या लॉबीने विशिष्ट दबाव तयारही केला होता. सोनिया गांधींनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर दबाव आणून पाकिस्तानचे झालेल्या गुप्त करारावर स्वाक्षरी करण्यासाठी त्यांना भाग पाडले होते. परंतु भारतीय लष्कराच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यावेळी ठाम भूमिका घेतली. भारतीय लष्कर सियाचीन ग्लेशियर मधून एक इंचही मागे हटणार नाही, असे भारतीय लष्कराने सरकारला स्पष्टपणे सांगितले होते. सर्व प्रकारच्या दबावानंतरही भारतीय लष्कर मागे हटलेच नाही. दबाव भारतीय लष्कराने सर्व दबाव झुगारून लावले, असे जनरल जे. जे. सिंग यांनी परखडपणे सांगितले.

हे तेच जनरल जे. जे. सिंग आहेत, ज्यांची लष्कर प्रमुखपदी नियुक्तीच मूळात काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने केली होती. त्यामुळे त्यांनी केलेल्या धक्कादायक खुलाशाला भारतीय परराष्ट्र धोरण + भारतीय संरक्षण धोरण आणि भारताची सीमावर्ती सुरक्षा या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे

Sonia Gandhi tried to give Siachen glacier to Pakistan.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात