सत्तेशिवाय राहू न शकणारे आयाराम-गयारामांची पळापळ नेहमीच सुरू होते. पश्चिम बंगालमध्ये त्याची सुरूवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल कॉँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या माजी आमदार सोनाली गुहा यांनी ममता बॅनर्जी यांची माफी मागत पक्षात पुन्हा घेण्याची विनंती केली आहे. Sonali Guha apologizes to Mamata Banerjee, urges her to rejoin party
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सत्तेशिवाय राहू न शकणारे आयाराम-गयारामांची पळापळ नेहमीच सुरू होते. पश्चिम बंगालमध्ये त्याची सुरूवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल कॉँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या माजी आमदार सोनाली गुहा यांनी ममता बॅनर्जी यांची माफी मागत पक्षात पुन्हा घेण्याची विनंती केली आहे.
सोनाली गुहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून पक्ष सोडल्याबद्दल माफी मागितली आहे. गुहा यांनी म्हटले आहे की अत्यंत दु:खद ह्रदयाने मी हे पत्र लिहिले होते. मी भावनेच्या भरात तृणमूल कॉँग्रेस सोडली होती. दुसºया पक्षात प्रवेश केला होता.
परंतु, मी येथे राहू शकत नाही. ज्याप्रमाणे मासा पाºयाशिवाय राहत नाही त्याप्रमाणेच दीदी मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे आपल्याकडे माफी मागत आहे. तुम्ही मला माफ केले नाही तर मी जगूच शकणार नाही. कृपया मला पक्षामध्ये परत घ्या. तुमच्या आशिर्वादाखाली बाकीचे आयुष्य जगण्याची परवानगी द्या.
सोनाली गुहा या पश्चिम बंगालमधून चार वेळा विधानसभेवर निवडून आल्या होत्या. एकेकाळी तर त्या ममता बॅनर्जी यांची छाया मान्लया जात होत्या. परंतु, २०२१ च्या निवडणुकीत तृणमूल कॉँग्रेसने आपल्या उमेदवारांच्या यादीत त्यांचा समावेश केला नाही. त्यामुळे एका कार्यक्रमात सोनाली गुहा तृणमूल कॉँग्रेसवर चांगल्याच भडकल्या होत्या. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. यंदाच्या निवडणुकीत गुहा लढल्या नव्हत्या. त्या म्हणाल्या होत्या की भाजपाची संघटना मजबूत करण्यासाठी काम करेल. एका टीव्ही चॅनलशी बोलताना सोनाली गुहा म्हणाल्या, भाजपामध्ये त्या कोणालाच नको आहेत. भाजपामध्ये प्रवेश करण्याचा माझा निर्णय चुकीचा होता. मी भाजपामध्ये स्वत:ला कायम अस्पृश्य समजत आलेआहे. त्यामुळे पक्ष सोडण्याबद्दल भाजपाला सांगणारही नाही. त्यांनी माझा ममता बॅनर्जींविरुध्द वापर करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मी हे होऊ दिले नाही. पुढच्या आठवड्यात आपण ममता बॅनर्जी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहोत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App