विशेष प्रतिनिधी
मुंबई : वेब ॲनालिसिस सर्विस प्रोव्हायडर असलेल्या सिमिलरवेबच्या सर्वेनुसार, स्नॅपचॅट हे गुगल प्ले स्टोअर वर जानेवारी ते ऑगस्ट या दरम्यान 102.4 वेळा भारतामध्ये डाऊनलोड केले गेले आहे. याच काळात इंस्टाग्राम डाऊनलोड हे भारतातील अँड्रॉइड डिव्हाईस वर 230 मिलियन वेळा डाउनलोड केले गेले. एका डिजिटल मिडिया एजन्सीच्या म्हणण्यानुसार स्नॅपचॅटचे भारतामध्ये जून 2019 मध्ये 70 लाख ऍक्टिव्ह युजर्स होते. त्यानंतर त्याच्या ऍक्टिव्ह युजर्स मध्ये वाढ झालेली दिसली.
Snapchat to make a comeback in India
15 ते 17 तसेच ते 20 ते 38 या वयोगटातील वापरकर्ते हाय कॉलिटी ‘AR filter’ हे व्हिडीओ बनविण्यासाठी वापरतात. त्याचबरोबर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर संपर्कात राहण्यासाठी भरपूर सेलिब्रिटीजनेही स्नॅपचॅटकडे परत यायला सुरुवात केली आहे.
टिक टॉकवरील बंदीचे चीनवर दीर्घकालीन परिणाम
इन्फ्ल्यून्सर मार्केटिंग एजन्सीच्या म्हणण्यानुसार नेटफ्लिक्स, मिंत्रा, स्पोटीफाय आणि नायका सारख्या कंपन्या स्नॅपचॅटमध्ये जास्त इन्वेस्टमेंट करत आहेत. विविध ब्रँड्स साठी स्नॅपचॅटमध्ये इन्वेस्ट करणे हेच योग्य असल्याचे मार्केटिंग फाउंडर प्रिन्स खाना यांनी म्हटलेले आहे.
भारतामध्ये इंस्टाग्राम वापरणारे युसर्स हे स्नॅपचॅट पेक्षा एक तृतीयांश जास्त आहेत. तरीपण एका माहितीनुसार असे समोर आलेले आहे की, स्नॅपचॅट हे टिकटॉकचे पर्याय असलेल्या MX टकाटक आणि जोश सारख्या ॲप्सनाही मागे टाकत आहे. स्नॅपचॅट आणि टिकटॉकची तुलना करणे योग्य नाही डिजिटल मार्केटर्सनी असे म्हंटले आहे. स्नॅपचॅटमध्ये युझर्स साठी कंटेंट आहे, तर टिक टॉक हे ‘influencers’ आणि कंटेंट क्रियेटर्स साठी आहे. शॉर्ट व्हिडिओ शेअरिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे कमी डिजिटल मार्केटिंग बजेट असलेल्या जाहिरातदारांबरोबर स्पर्धा करतात असे त्यांनी सांगितले.
या सगळ्या गोष्टी आणि मते लक्षात घेता, स्नॅपचॅट लवकरच भारतामध्ये परत येत असल्याचे चिन्ह दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App