बिहार, गुजरातमध्ये अन्नधान्य उत्पादनात लक्षणीय घट; केरळमध्ये रोजंदारीचे प्रमाण सर्वाधिक, भारतीय रिझर्व्ह बँकेचा अहवाल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केरळमध्ये बांधकाम मजुरांचे दैनंदिन वेतन देशात सर्वाधिक आहे. तेथे बांधकाम करणाऱ्या मजुराला दररोज सरासरी 852 रुपये मिळतात. तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर आहे. तेथे दररोज 500 रुपये मिळतात. उत्तर भारतात ही रक्कम फक्त एक तृतीयांश आहे. मध्य प्रदेशात रोजची मजुरी 278 रु., गुजरातमध्ये 323 रु., महाराष्ट्र 371 रु., राजस्थान 393 रु., यूपी 352 रु. आणि बिहारमध्ये 342 रु.आहे. आरबीआयच्या वार्षिक हँडबुकच्या ताज्या अंकात हा खुलासा केला आहे. Significant decline in foodgrain production in Bihar, Gujarat; Kerala has highest daily wages, RBI report

शेतमजुरांचे सरासरी दैनंदिन उत्पन्न केरळमध्ये सर्वाधिक 764 रु. आहे. मध्य प्रदेशात सर्वात कमी 229 रु. प्रतिदिन आहे. केरळमध्ये 2021-22च्या तुलनेत 2022-23 मध्ये बांधकाम मजुरांचे दैनंदिन वेतन 15 रु. वाढले. तर मध्य प्रदेशात ते केवळ 12 रु. वाढले. राजस्थानात बांधकाम मजुरांचे दैनंदिन वेतन राष्ट्रीय सरासरीइतके आहे. देशातील 11 राज्यांतील कामगारांचे दैनंदिन उत्पन्न राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. देशात एकूण 2,46,504 कारखाने आहेत. तामिळनाडूत सर्वाधिक 38,837 तर गुजरात दुसऱ्या क्रमांकावर असून तेथे 28,479 कारखाने आहेत. 25,610 सह महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.

देशांतर्गत सकल उत्पादनात दिल्ली प्रथम

देशातील राज्यस्तरीय सकल देशांतर्गत उत्पादनात एका वर्षातील सर्वात मोठी वाढ दिल्लीत झाली आहे. येथे वर्षभरात राज्याचे देशांतर्गत दरडोई उत्पादन 19 हजार रुपये वाढले आहे. हे प्री-कोविड म्हणजेच 2019-20 मधील 2,60,559 ची पातळी ओलांडली आहे. सिक्कीम दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे गेल्या वर्षी 13.5 हजार रुपये प्रतिव्यक्ती दरडोई उत्पन्नात वाढ झाली आहे. राज्याचे देशांतर्गत उत्पादन हे राज्याच्या उत्पन्नाचे सर्वात महत्त्वाचे सूचक आहे.

अन्नधान्य उत्पादनात मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये वाढ

एका वर्षात देशातील अन्नधान्य उत्पादनात 4.7% वाढ झाली. 2021-22 मधील 3,15,615 हजार टनांच्या तुलनेत, 2022-23 मध्ये उत्पादन 3,30,534 टन होते. परंतु बिहार, गुजरात, हिमाचल आणि झारखंडमध्ये घट नोंदवली गेली. झारखंडमध्ये सर्वाधिक 40% घट झाली. म.प्र. (13.5%), पंजाब (6.6%), राजस्थान (8.1%), महाराष्ट्र (3.5%) मध्ये उत्पादन वाढले आहे.

Significant decline in foodgrain production in Bihar, Gujarat; Kerala has highest daily wages, RBI report

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात