वृत्तसंस्था
नवी दिल्ली : लव्ह जिहाद प्रकरणातून मुलीची निर्घृण हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईत कॉल सेंटरमध्ये काम करणारी एक हिंदू मुलगी श्रद्धा मदान आणि आफताब अमीन पूनावाला यांच्यात मैत्री झाली, या मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. पण घरच्यांच्या विरोधामुळे ते दिल्लीला पळून गेले. त्यानंतर झालेल्या भांडणात आफताबने या मुलीचे 35 तुकडे करत तिची हत्या केली आहे. या घटनेमुळे मुंबईत प्रचंड खळबळ उडाली आहे. Shraddha went with Aftab even though she was beaten first
काय आहे प्रकरण?
मुलीच्या जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय श्रद्धा मदान आणि आफताब अमीन पूनावाला या दोघांची मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. पण मुलीच्या घरच्यांच्या विरोधामुळे हे दोघे जण वसईत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते.
पण आफताब श्रद्धाला रोज बेदम मारहाण करत होता. त्यामुळे श्रद्धा आफताबला सोडून गेली होती. पण काही दिवसांनी आफताब पुन्हा एकदा श्रद्धाला भेटला आणि आपली चूक झाली असे सांगून त्याने तिला भुलवले. तिनेही आफताबवर आंधळा विश्वास ठेवला आणि हे दोघेही दिल्लीच्या छतरपूर परिसरात राहण्यासाठी गेले.
केली निर्घृण हत्या
सहा महिन्यांपूर्वी 18 मे रोजी आफताब आणि श्रद्धा यांच्यात काही कारणांवरुन कडाक्याचे भांडण झाले. मुलगी यावेळी आरडाओरडा करत असल्यामुळे तिचा आवाज कोणाला जाऊ नये म्हणून आफताबने मुलीचे तोंड दाबले आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. यानंतर आफताबने मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले.
त्यासाठी त्याने मुलीच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि 18 दिवस हे तुकडे तो मेहरौलीच्या जंगलात फेकत होता. मुख्य म्हणजे तिच्या मृतदेहाच्या तुकड्यांचा दुर्गंध येऊ नये म्हणून त्याने एक फ्रीज खरेदी करुन त्यात मुलीच्या मृतदेहाचे तुकडे साठवून ठेवले होते.
पोलिसांनी असा केला तपास
दरम्यान, श्रद्धाशी अनेक दिवस कोणताही संपर्क न झाल्यामुळे तिच्या वडिलांनी दिल्लीतील मेहरौली पोलिस ठाण्यात श्रद्धाच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा तपास करायला सुरुवात केली. तपास करताना पोलिस आफताब पर्यंत पोहोचले. पण त्याच्या चौकशीत श्रद्धा आपल्याला सोडून गेली असून, आपला तिच्याशी कोणताही संपर्क झाला नसल्याची खोटी माहिती आफताबने पोलिसांना दिली. पण मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आफताब विरोधात गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणाचा सखोल तपास केला.
त्यानंतर अखेर 6 महिन्यांनी या क्रूर हत्येचा छडा लागला असून, आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे मेहरौली येथील जंगलात विविध ठिकाणी फेकून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीसांनी आफताबला ताब्यात घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App