विशेष प्रतिनिधी
पुणे : मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण हा विषय महाराष्ट्रात चिघळल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी सिल्वर ओक वर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. त्यांना महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. परंतु या आवाहनानंतर शरद पवारांनी आरक्षणाच्या वादाचा चेंडू सत्ताधारी पक्षांवरच टोलविण्याची संधी घेतली. ओबीसी आणि मराठा आरक्षणासंदर्भात सत्ताधारी पक्षांवरच शरद पवारांनी गंभीर आरोप केले. Sharad pawar targets shinde fadnavis government over maratha and OBC reservation after meeting with chagan bhujbal
मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला शरद पवारांची फूस आहे, असे आरोप समाजाच्या विविध स्तरांतून होत असताना छगन भुजबळ पवारांच्या भेटीला गेले. त्यांना महाराष्ट्रातला वाद थांबवण्याची विनंती केली, पण भुजबळांच्या भेटीची संधी मात्र शरद पवारांनी आरक्षणाचा वाद सत्ताधाऱ्यांवर टोलवण्यासाठी घेतली, असे शरद पवारांच्या आजच्या पुण्यातल्या पत्रकार संवादातून स्पष्ट झाले.
शरद पवार म्हणाले :
आरक्षणासंदर्भात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला मी गेलो नाही. दोन कारणे होती. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्यांनी जरांगेचं उपोषण सुरू होतं. त्यांना भेटले. त्यांचा संवाद काय झाला माहिती नाही. त्यानंतर उपोषण सुटलं. त्यानंतर जरांगे पाटील यांची नवी मुंबईत एक संयुक्त कार्यक्रम पाहिला. याचा अर्थ काही तरी त्यांच्यात संवाद होता. पण तो आम्हाला माहिती नव्हता.
विरोधकांनी मत मांडावं असा त्यांचा आग्रह आहे. राज्यकर्ते हे, निर्णय द्यायचा अधिकार यांचा, सुसंवाद त्यांनी साधला आणि विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी आणि मग निर्णय घ्यावा. ही भूमिका संमजसपणाची नव्हती, शहाणपणाची नव्हती, असं शरद पवार म्हणाले. सत्ताधाऱ्यांच्या विधानांमुळेच राज्यात वाद वाढला, असा आरोपही पवारांनी केलाय.
ओबीसी नेत्यांचं उपोषण सुरू होतं. तिथे राज्य सरकारचे मंत्री गेले. त्यांचं काय बोलणं झालं माहिती नाही. त्यांच्यातील सुसंवाद माहिती नाही. त्यामुळे मिटिंगला जाण्याचं कारण एकच होतं की, सरकार जरांगे आणि ओबीसीं नेत्यांशी बोलत आहेत. त्यानंतर नेते काही विधानं करत आहेत. पण संवाद काय झाला आणि प्रस्ताव काय होता हे लोकांना आणि आम्हाला माहीत नव्हतं. त्यामुळे जरांगे यांना सरकारने काय आश्वासन दिलं याचं वास्तव चित्र आपल्याकडे येत नाही आणि दुसऱ्या बाजूने ओबीसींना जी कमिटमेंट केली त्याची माहिती येत नाही, तोपर्यंत जाऊन चर्चा करण्यात अर्थ नाही. त्यांनी आम्हाला माहिती दिली तरच आम्ही जाऊ शकतो असं ठरवलं. त्यांनी ४०-५० लोकांना बोलावलं आणि चर्चा केली. तिथे मत मांडावं असं योग्य वाटलं नाही.
भुजबळांसोबत काय चर्चा?
छगन भुजबळ म्हणाले, झालं गेलं सोडून द्या, मार्ग काढावा लागेल. नाहीतर महाराष्ट्रात वाद वाढतील. स्पष्ट सांगायचं म्हणजे या लोकांनी जी विधाने केली ती वाद वाढायला मदत करणारी होती. मार्ग काढायाचा असेल तर राज्यकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. राज्यकर्त्यांनी कितपत ही भूमिका घेतली माहिती नाही. पण तसं दिसलं नाही. या सर्व गोष्टीत जे कोणी सरकारच्या वतीने चर्चेला मुख्यमंत्री होते, भुजबळ, फडणवीस, अजित पवार होते. इतर काही लोकं. या लोकांनी काय निर्णय घेतला बैठकीत आम्हाला माहिती नव्हते. आम्हाला बाजूला ठेवून यांनी निर्णय घेतले.
आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी शरद पवार यांची गरज आहे. असं मार्गदर्शन भुजबळांनी केलं. मी सांगितलं प्रश्न सोडवायचे असेल तर जरांगेंना काय कमिटमेंट दिल्या, कोणत्या गोष्टीची पूर्तता केली आणि करणार आहात जरांगेंना सांगा. ओबीसीना त्यांच्या हिताची काही कमिटमेंट केली ती माहिती आम्हाला द्या. त्यातून काही चांगलं निघत असेल तर तुमची धोरणं दुरुस्त करून, बाकीच्या गोष्टी विसरून पुढे जाऊ. आज शांततेची गरज आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App