विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र सोडून इतर राज्यांच्या निवडणुकाही लढवणार आहे, पण यातून मित्राचे राज्य मात्र पवार वगळणार आहेत. Sharad pawar NCP will not contest jammu Kashmir elections
येत्या वर्षाखेरीस महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर यांच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापैकी जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणुका निवडणूक आयोगाने आधीच जाहीर केल्या आहेत. अर्थातच शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राची निवडणूक महाविकास आघाडीतून लढवणार आहे, पण त्याचबरोबर पवार हरियाणा आणि झारखंड या दोन राज्यांमध्ये आपल्या पक्षाच्या तुतारी या चिन्हावर काही उमेदवार उभे करणार आहेत. पण जम्मू-काश्मीरमध्ये मात्र पवारांच्या पक्षाचे उमेदवार उभे राहणार नाहीत, हे त्यांनी स्वतःच सांगितले.
Kolkata rape : मृत्यूपूर्वी पीडितेला दिल्या जखमा, बलात्काराची पुष्टी, पण फ्रॅक्चर नाही; कोलकाता घटनेचा तपशीलवार पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर
याचा अर्थ शरद पवार आपल्या मित्राचे राज्य वगळून इतरत्र निवडणूक लढवणार आहेत. शरद पवार आणि फारुख अब्दुल्ला यांची राजकीय आणि वैयक्तिक मैत्री सर्वश्रुत आहे. फारूक अब्दुल्लांचे पुत्र ओमर अब्दुल्ला मुंबईमध्ये शिकत असताना ते अनेक वर्षे शरद पवारांच्या घरी राहिले होते. त्यामुळे ओमर अब्दुल्ला आणि सुप्रिया सुळे यांची देखील मैत्री घट्ट आहे.
अब्दुल्ला पिता पुत्रांचा पक्ष नॅशनल कॉन्फरन्स जम्मू-काश्मीर मधला आघाडीचा पक्ष आहे. तो पक्ष अर्थातच तिथे विधानसभेची निवडणूक लढवणार आहे, पण स्वतः ओमर अब्दुल्ला निवडणुकीच्या मैदानात उतरणार नसून फारूक अब्दुल्लाच नॅशनल कॉन्फरन्सच्या निवडणुकीचे संचालन करणार आहेत. शरद पवारांनी मात्र मित्राच्या राज्यात निवडणूक लढण्यापासून स्वतःच्या पक्षाला बाजूलाच ठेवणे पसंत केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App