मृतांचा आकडा वाढण्याची भीती; स्फोट इतका भीषण होता की परिसरातील अनेक घरांचेही नुकसान झाले.
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील दत्तपुकुर भागात रविवारी सकाळी बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. स्फोट इतका भीषण होता की परिसरातील अनेक घरांचेही नुकसान झाले. Several people feared dead in an explosion at the Illegal crackers factory in Duttapukur West Bengal
या स्फोटाच्या घटनेनंतर भाजपाने ममता सरकारवर हल्ला चढवला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार म्हणाले की, ममता बॅनर्जी संपूर्ण राज्याला स्मशानभूमी बनवूनच स्वस्थ बसरणार आहेत का? स्थानिक लोकांनी सांगितले की, माजपूर जगन्नाथपूरजवळील एका कारखान्यात झालेला स्फोट इतका भीषण होता की अनेक घरांचे पत्रे उडाले आणि किमान १० लोक जखमी झाले, मृतदेह जागीच विखुरले गेले.
या स्फोटातील जखमींना बारासात रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगितले गेले आहे. गजबजलेल्या भागात फटाक्याचा कारखाना कसा चालू होता. याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे की, याआधी पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील एग्रा येथे एका बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला होता. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी सांगितले की, कोलकात्याच्या उत्तरेला सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या दत्तपुकुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नीलगंजमधील मोशपोल येथील कारखान्यात अनेक लोक काम करत होते. त्यावेळी अचानक कारखान्यात स्फोट झाला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App