आठ मुख्य न्यायाधीशांच्या नेमणुकीचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाकडून शिफारस

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – देशभरातील विविध न्यायालयांत मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा झाला असून सर्वोच्च न्यायालयाने यासाठी आठ नावांची शिफारस केंद्र सरकारला केली आहे.SC collegiums remands 8 names

आता अलाहाबाद उच्च न्यायालयांप्रमाणेच कोलकता, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगण, मेघालय, गुजरात आणि मध्यप्रदेश उच्च न्यायालयांना नवे मुख्य न्यायाधीश मिळतील. कॉलेजियमच्या बैठकांनंतर या न्यायाधीशांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.



सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय कॉलेजियमने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये न्या. यू.यू. ललित आणि न्या.ए.एम.खानविलकर यांचा देखील समावेश होता. या आठ नावांमध्ये कोलकता उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल यांचा देखील समावेश असून

त्यांची आता अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बदली करण्यात आली आहे. कॉलेजियमकडूनच तशी शिफारस करण्यात आली आहे. त्रिपुरा उच्च न्यायालयातील न्यायाधीश आकील कुरेशी यांची राजस्थान उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे.

SC collegiums remands 8 names

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात