करतारपूर साहिब पाकिस्तानात गेले ही त्यावेळच्या राज्यकर्त्यांची चूकच; राजनाथ सिंग यांचे परखड प्रतिपादन


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – भारत – पाकिस्तान फाळणीच्या वेळी करतारपूर साहिब पाकिस्तानात जाऊ दिले, ही त्यावेळच्या राज्यकर्त्य़ांची चूकच झाली. फाळणीच्या वेळी भारतीय नेतृत्वाने जरा जरी काळजी घेतली असती, तर हिंदुस्थानातले शीखांचे पवित्र स्थान करतारपूर साहिब तेव्हा पाकिस्तानात गेलेच नसते. ते भारतातच राहिले असते, असे परखड प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केले आहे. यंग शीख अचिव्हर्सच्या कार्यक्रमात ते बोलत होते. Had some caution been taken at the time of partition then Kartarpur Sahib would not have been in Pakistan, but in India.

राजनाथ सिंग यांनी हे वक्तव्य करून पंजाबमधील हिंदू, शीख समूदायाच्या फाळणीच्या वेदनांना वाट मोकळी करून दिली आहे. करतारपूर साहिब भारतातच राहावे, असा आग्रह त्यावेळी शीखांचे नेते मास्टर तारासिंग यांनी धरला होता. परंतु, त्यावेळच्या दिल्लीतल्या राज्यकर्त्यांचा त्यांना पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळे करतारपूर पाकिस्तानात गेले. या इतिहासाचीच उजळणी राजनाथ सिंग यांच्या वक्तव्यामुळे झाली आहे.

त्याचवेळी संपूर्ण हिंदुस्थान तुमचा असताना खलिस्तानची बात कशाला करता, असे भावनिक आवाहन राजनाथ सिंग यांनी केले आहे. राजनाथ सिंग म्हणाले, की भारताच्या हजारो वर्षांच्या संस्कृती उभारणीत आणि रक्षणात शीख समुदायाचे अतुलनीय योगदान आहे. समस्त भारतीय हे योगदान कधीच विसरू शकत नाहीत. शीखांनी आपला जाज्वल्य इतिहास सगळया भारतीयांना समजावून सांगितला पाहिजे. शीख युवकांनी आपला इतिहास समजून घेतला पाहिजे.

‘Shining Sikh Youth of India’ या पुस्तकाचे प्रकाशन राजनाथ सिंग यांच्या हस्ते झाले. आज काही लोक स्वतंत्र खलिस्तानची मागणी करीत असतात. पण मी त्यांना आणि संपूर्ण शीख समूदायाला विचारू इच्छितो, की संपूर्ण हिंदुस्थान तुमचा – शीख समूदायाचा असताना स्वतंत्र खलिस्तानची बात कशाला करायची… शीख समूदायाचे भारताच्या इतिहास, वर्तमान आणि भविष्याच्या उभारणीत प्रचंड मोठे योगदान आहे. ते कोणीही भारतीय विसरू शकत नाहीत. शीख समूदायाने देखील ते विसरता कामा नये, असे भावनिक आवाहन राजनाथ सिंग यांनी केले.

Had some caution been taken at the time of partition then Kartarpur Sahib would not have been in Pakistan, but in India.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात