सावरकरांची बदनामी : राहुल गांधींना इतिहासाचे अल्पज्ञान, त्यांना कोणी सिरीयसली नाही घेत; अमित शाहांचा टोला


विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : माफीवीर म्हणून खासदार काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केली. परंतु, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचा वेगळ्या शब्दात समाचार घेतला आहे. सावरकर कोण होते?, हे देशातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे. पण राहुल गांधींचे इतिहासाचे ज्ञान अल्प आहे. त्यामुळे ते बदनामीकारक वक्तव्ये करत राहतात. त्यांना कोणी सिरियसली घेत नाही, असा टोला अमित शाह यांनी राहुल गांधींना लगावला आहे.  Savarkar’s insult : nobody takes Rahul Gandhi seriously in Indian politics, targets Amit Shah

भारत जोडो यात्रेदरम्यान महाराष्ट्रात राहुल गांधी यांनी सावरकरांना माफीवीर म्हणून त्यांची बदनामी केली होती. या मुद्द्यावरून राहुल गांधी यांच्या विरोधात महाराष्ट्रासह देशात संताप उसळला. मात्र, त्यावर गेल्या दोन दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. मात्र एका टीव्ही चॅनलच्या मुलाखतीत अमित शाह यांना सावरकरांच्या बदनामी संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी राहुल गांधींना एकापाठोपाठ एक टोले लगावले.

राजधानी नवी दिल्लीतील आपल्या सरकारी बंगल्यात आपण ज्या दिवाणखान्यात बसता, त्या आपल्या कोच मागे फक्त दोनच फोटो आहेत. एकीकडे आर्य चाणक्य यांचा फोटो आहे, तर दुसरीकडे वीर सावरकरांचा फोटो आहे. आपल्या आदर्श पुरुषांवर जेव्हा कोणी चिखलफेक करतो, तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असते?, असा प्रश्न अमित शाह यांना अँकरने विचारल्यावर अमित शहा यांनी तात्काळ उत्तर दिले. राहुल गांधी यांचे इतिहासाचे ज्ञान अल्प आहे. त्यांनी वारंवार सावरकरांविषयी गैरउद्गार काढले आहेत. पण देशात त्यांना कोणी सिरियसली घेत नाही. जे सावरकरांवर टीका करतात त्यांनी सावरकर ज्या अंदमानच्या काल कोठडीत राहिले, तेथे 10 तास राहून दाखवावे आणि मग बोलावे, असा टोला अमित शाह यांनी लगावला.

त्याच वेळेला वीर सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचा आढावा देखील अमित शाह यांनी घेतला. काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यापूर्वी वीर सावरकरांनी युरोपमध्ये जाऊन भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी मोठी चळवळ उभारली होती. ते पहिले क्रांतिकारक नेते होते, ज्यांनी 1857 च्या विद्रोहाला स्वातंत्र्यसमर असे नामाभिधान दिले. त्यावर ग्रंथ लिहिला. परंतु, ब्रिटिशांनी तो प्रसिद्ध होण्यापूर्वीच त्यावर बंदी आणली. ही जगाच्या इतिहासातली एकमेव घटना असल्याचे अमित शाह यांनी नमूद केले. सावरकर हे एकमेव स्वातंत्र्ययोद्धे आहेत, ज्यांना ब्रिटिशांनी दोन हा जन्म काळेपणाच्या कारावासाची शिक्षा दिली होती पण त्यांना कोणत्याही सरकारने वीर हा किताब दिला नाही, तर संपूर्ण देशवासीयांनी वीर हा किताब दिला आहे, याची आठवण त्यांनी करून दिली.

गुजरात मध्ये पुन्हा भाजप सरकार

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मुलाखतीत अमित शहा यांनी निवडणुकी संदर्भातल्या सर्व प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. राहुल गांधी यांच्या समवेत भारत जोडो यात्रेत मेधा पाटकर सामील झाल्या होत्या. त्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात मधल्या प्रचार सभेत काँग्रेसवर शरसंधान साधले होते. हा मुद्दा देखील अमित शहा यांनी उचलून धरला. ज्या मेधा पाटकर यांच्या एनजीओने गुजरातमध्ये जनतेला नर्मदेचे पाणी मिळू दिले नाही. नर्मदा पर परियोजना बनू दिली नाही. त्या मेधा पाटकर आज काँग्रेस समवेत भारत जोडो यात्रेत आहेत. सरदार सरोवर प्रकल्पाची भूमिपूजन माझ्या जन्माच्या अगोदर म्हणजे 1962 मध्ये पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी केले होते. पण 2015 मध्ये प्रकल्प पूर्ण होऊन गुजरातच्या जनतेला पाणी मिळाले. हा विलंब काँग्रेस आणि मेधा पाटकर यांच्यामुळे झाला, असा आरोप अमित शाह यांनी केला.

भाजपमध्ये 2022 च्या निवडणुकीत सर्वात कमी बंडखोरी झाल्याचा दावाही त्यांनी केला.

Savarkar’s insult : nobody takes Rahul Gandhi seriously in Indian politics, targets Amit Shah

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात