राहुल गांधींनी सावरकरांविषयी काय बोलावे हे उद्धव ठाकरेंनी सांगू नये; माणिकराव ठाकरेंनी भरला उलटा दम!!


प्रतिनिधी

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयी काँग्रेस खासदार राहुल गांधींनी अवमानास्पद उद्गार काढल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस यांच्यात निर्माण झालेली दरी कमी व्हायला तयार नाही. भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी सावरकरांविषयी बोलायलाच नको होते, अन्यथा महाविकास आघाडी तुटू शकते, असा इशारा संजय राऊत यांनी दिल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शिवसेनेला उलटा दम भरला आहे. Uddhav Thackeray should not tell Rahul Gandhi what to say about Savarkar

माणिकराव ठाकरे म्हणाले, सावरकरांच्या विषयावर उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांची भूमिका वेगळी आहे. पण म्हणून आम्ही त्यांनी त्यांची भूमिका सोडावी असे म्हणणार नाही आणि आम्हीही आमची भूमिका सोडणार नाही. राहुल गांधींनी काय बोलावे याबाबत उद्धव ठाकरे यांनी आम्हाला काही सांगू नये, असा दम माणिकराव ठाकरे यांनी भरला. माणिकरावांच्या या चर्चेमुळे वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहेत.


Savarkar Bombay Council : सावरकर जेव्हा मुंबई प्रांतिक विधिमंडळाची निवडणूक लढवू इच्छित होते…!!


– काय म्हणाले माणिकराव ठाकरे? 

आम्ही त्यांना विचार सोडून आमच्यासोबत या म्हटले नव्हते, आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्र येत किमान समान कार्यक्रम आखला. जो जनहिताच्या आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. राहुल गांधींनी सावरकरांविषयी लेखी पुरावा दिला. भारत आणि पाकिस्तान फाळणीचा विचार वीर सावरकर विचारसरणीच्या लोकांनी केला. हिंदू, मुस्लीम एकत्र राहू शकत नाही अशी त्यांची भूमिका उघड आहे. उद्धव ठाकरे आणि आमच्यात वाद झाला नाही. त्यांची भूमिका ते मांडत आहेत आणि आमची भूमिका आम्ही मांडतोय. त्यामुळे वाद झाला, आता सोबत येणार नाही वगैरे या चर्चेला अर्थ नाही, असेही माणिकराव ठाकरे म्हणाले.

माणिकराव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अध्यक्ष कोणाची प्रतिक्रिया आलेली नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांची परस्पर विरोधी भूमिका मात्र आणखी ठळक झाली आहे.

Uddhav Thackeray should not tell Rahul Gandhi what to say about Savarkar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात